सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त

पुणे- अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव ‘कृतज्ञताभावा’ने विविध आध्यात्मिक उपक्रमांच्या आधारे भारतभर साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ३१ ठिकाणी प्रभु श्रीरामाला ‘रामराज्य’ येण्यासाठी साकडे घालण्यात आले आणि राष्ट्र अन् धर्म यांसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. याला १ सहस्र ६०५ हून अधिक धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचे स्रोत आहेत. त्यासाठी मंदिर स्वच्छतेचेही उपक्रम विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे. यामध्ये कोथरूड, राजगुरुनगर, सिंहगड रस्ता, दौंड, तळेगाव, कोथरूड, मंचर, हडपसर, थेरगाव, वल्लभनगर, चिंचवड, भोसरी आदी ठिकाणे आहेत.
क्षणचित्रे –
१. वैष्णोदेवी मंदिर, जम्मू येथे धर्माभिमानी हिंदूंनी रामराज्यासाठी साकडे घातले आणि प्रार्थना केली.
२. पारगाव येथील धर्मप्रेमी श्री. गणेश ताकवणे सहकुटुंब आणि नातेवाइकांसमवेत केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले असतांना त्यांनी तेथे हिंदुराष्ट्रासाठी साकडे घातले.
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !