‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ रहित करा; अन्यथा तीव्र आंदोलन ! – हिंदु एकता आंदोलन, कोल्हापूर

 ‘हिंदु एकता आंदोलना’ची चेतावणी

निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देतांना हिंदु एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर, २१ मे – हिंदु मंदिरांचे अस्तित्व आणि भाविकांच्या श्रद्धा धोक्यात आणणारा ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ रहित करा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ‘हिंदु एकता आंदोलन’ संघटनेने दिली आहे. या मागणीसाठी १९ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला ‘अखिल महाराष्ट्र गुरव समाज सुधारक मंडळ’ यांनीही त्यांचा पाठिंबा घोषित केला आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणारे हिंदु एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते

या प्रसंगी ‘हिंदु एकता आंदोलना’चे सर्वश्री दीपक देसाई, विलास मोहिते, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार, तसेच अर्चना जाधव, पूजा शिंदे, अंजली जाधव यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.