
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त २ होम होणार असल्याची पूर्वसूचना मिळणे
‘साधारण ८ दिवसांपूर्वी, म्हणजे २७.४.२०२६ या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त २ होम केले जातील आणि त्यांतील एक देवीचा अन् दुसरा साधकांच्या आरोग्यासाठी असेल.’
४.५.२०२६ या दिवशी रामनाथी आश्रमातील फलकावर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ६.५.२०२६ या दिवशी ‘चंडी होम’ आणि ८.५.२०२६ या दिवशी ‘आयुष होम’, असे २ होम असतील’, अशी सूचना लिहिली होती. ती वाचल्यावर ‘देवाने मला वरील विचार दिला होता’, याचे मला स्मरण झाले.
२. चंडी होम आणि आयुष होम होणार असल्याची आश्रमातील फलकावरील सूचना वाचल्यावर सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

२ अ. ‘आश्रमातील वातावरणात आणि पृथ्वीवर सर्वत्र देवीतत्त्व कार्यरत झाले आहे’, असे मला जाणवले.
२ आ. मला पृथ्वीवरील वातावरणात निळ्या आणि जांभळ्या रंगांचा प्रकाश दिसला.
२ इ. चंडी होमातून सुगंध येऊन शरिरात गारवा निर्माण होणे : मला चंडी होमातून प्रक्षेपित होत असणार्या चैतन्याचा सुगंध आला. ‘हा सुगंध २० टक्के मारक आणि ४० टक्के तारक आहे’, असे मला जाणवले. या सुगंधाने माझ्या शरिरात गारवा निर्माण झाला.
२ ई. ‘आयुष होम केल्यावर साधकांचे ४० ते ६० टक्के शारीरिक त्रास उणावतील’, असे मला जाणवले.
२ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या सिद्धतेचे दैवी दृश्य सूक्ष्मातून दिसणे : ‘मी पृथ्वीवर नसून विष्णुलोकात आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला पुढील दैवी दृश्य दिसले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाची सिद्धता चालू आहे. देवी-देवता सुंदर वस्त्रे आणि सुवर्णालंकार परिधान करून सर्वत्र सुहास्यवदनाने अन् विष्णुनाम घेत भान हरपून सेवा करत आहेत. मीही सुंदर वस्त्रे आणि सुवर्णालंकार परिधान केले आहेत अन् विष्णुनाम घेत सेवा करत आहे. देवता तोरण बांधत आहेत. देवी गुरुदेवांच्या महालातील विष्णुतत्त्वाची नक्षी असलेले खांब आणि गुरुदेवांचे सिंहासन मोगर्याच्या फुलांनी सजवत आहेत. विष्णुलोकातील वातावरण सुगंधी झाले आहे. गुरुदेवांकडे देवी-देवतांचे लक्ष वेधले गेले आहे. महालात आणि मार्गिकेमध्ये दोन्ही बाजूंना, तसेच अंगणात रांगोळ्या अन् फुले यांची सजावट चालू आहे. विष्णुलोकात सर्वत्र समया आणि पणत्या प्रज्वलित झाल्या आहेत. विष्णुलोकातील जलकुंडात निळ्या-गुलाबी कमळांच्या फुलांची गोलाकार रचना केली आहे. सर्व प्रकारची मिष्टान्ने बनवून श्रीविष्णूला नैवेद्य दाखवण्याची सिद्धता चालू आहे. ही सर्व सिद्धता पहाण्यासाठी श्रीविष्णूच्या रूपातील गुरुदेव विष्णुलोकात पायी भ्रमण करत आहेत. या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी श्रीविष्णूच्या रूपातील गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०२६)
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !