Pakistan Spy Arrest : गेली २० वर्षे पाकसाठी हेरगिरी करणार्‍या जफर याला अटक

पाकिस्तानी महिलेशी केला होता विवाह

AI निर्मित चित्र

कोलकाता (बंगाल) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या जफर रियाझ उपाख्य रिझवी याला अटक केली. तो कोलकात्याचा रहिवासी असून त्याने एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला आहे. सध्या जफरची पत्नी आणि मुले पाकिस्तानातच रहातात.

जफर वर्ष २००५ पासून भारत आणि पाकिस्तान येथे सतत प्रवास करत होता. याच वेळी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी त्याला जाळ्यात ओढले आणि हेरगिरीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी जफरला पैशांचे आमीष दाखवले होते. याव्यतिरिक्त त्याला पाकिस्तानचे नागरिकत्व मिळवून देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. या बदल्यात रिझवी हा भारताशी संबंधित संवेदनशील आणि गोपनीय सुरक्षा माहिती पाकिस्तानपर्यंत पोचवण्याचे काम करत होता.

संपादकीय भूमिका

  • इतकी वर्षे भारतात हेरगिरी केली जात असतांना भारतीय यंत्रणा काय करत होत्या ?
  • आता अटकेतील आतंकवाद्यांना कारागृहात ठेवून पोसत बसण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे किंवा तसा कायदाच केला पाहिजे !