Lashkar Terrorist Murder : पाकमध्ये अज्ञात व्यक्तींकडून लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याची हत्या

आतंकवादी फरमान अली (चौकटीत)

लाहोर (पाकिस्तान) – पाकमध्ये आणखी एका आतंकवाद्याला अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार मारले. फरमान अली असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानची आतंकवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’चा ‘ऑपरेटिव्ह’ (प्रत्यक्ष कारवाया करणारा) होता.

त्याच्या अंत्यविधीचे नमाजपठण त्याच दिवशी, म्हणजे १६ मे या दिवशी मुरीदके येथील तोयबाचे  मुख्यालय ‘मरकज तैयबा’ येथे करण्यात आले.