हसतमुख, प्रेमळ आणि अनेक अडचणींवर मात करून तळमळीने सेवा करणार्‍या केरळ येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मंजुळा राजेंद्रन् (वय ६१ वर्षे) !

सौ. मंजुळा राजेंद्रन्

१. कु. अदिती सुखटणकर आणि श्री. नंदकुमार कैमल, कोची सेवाकेंद्र, केरळ.

१ अ. हसतमुख : ‘सौ. मंजुळाअक्का सतत हसतमुख असतात. त्या कोची सेवाकेंद्रात आल्यावर प्रथम सर्वांकडे बघून हसत नमस्कार करतात. त्यामुळे सर्वांना पुष्कळ प्रसन्न वाटते.

१ आ. नम्रता : त्यांना त्यांच्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठे साधक भेटल्यावर त्या त्यांना वाकून नमस्कार करतात.

१ इ. प्रेमभाव : त्यांच्या घरी साधक गेले की, अक्का त्या साधकांना आवर्जून खाऊ देतात. त्यांच्या मनात साधकांप्रती आदर आणि प्रेम आहे.

१ ई. निर्मळता आणि मनमोकळेपणा : त्या मनाने निर्मळ आहेत. त्यांच्या मनात येणारे सर्व विचार आणि प्रसंग त्या मोकळेपणाने अन् प्रांजळपणे सांगतात. ‘मंजुळाअक्का, म्हणजे भोळा भाव !’, असे आम्हाला वाटते.

१ उ. एकदा त्यांनी मला सांगितले, ‘‘मी अनेक वर्षे स्वतःसाठी कपडे विकत घेतले नाहीत. मला आता कशाचीही आवश्यकता वाटत नाही.’’

१ ऊ. सेवाभाव

१ ऊ १. सेवेची तळमळ : त्यांचे घर सेवाकेंद्रापासून १० कि.मी. अंतरावर आहे. त्या आठवड्यातून एकदा घरातील कामे आवरून ३ बस पालटून आणि नंतर रिक्शाने प्रवास करून अन् भाडेखर्च करून दुपारी १२ वाजता सेवाकेंद्रात सेवेसाठी येतात आणि संध्याकाळी घरी परत जातात.

१ ऊ २. सांगितलेली कोणतीही सेवा त्या मनापासून करतात.

१ ऊ ३. अडचणींवर मात करून सेवा करणे : त्या वर्ष २०१२ पर्यंत सेवेसाठी नियमित येत असत. काही कारणामुळे त्यांच्या साधनेला घरून विरोध चालू झाला. त्यामुळे त्यांना संपर्क करणे किंवा सत्संगाला ‘ऑनलाईन’ जोडणे शक्य नव्हते. त्यांच्या मुलाने दूरभाषची जोडणी (कनेक्शन) बंद केली होती. तेव्हा त्या घरी राहून जमेल तसे साधनेचे प्रयत्न करत असत. याच कालावधीत त्या ४ वर्षे आजारी होत्या. तेव्हा त्यांचे सेवाकेंद्रात येणे पूर्णपणे बंद झाले. बर्‍या झाल्यावर त्या २ वर्षांपासून पुन्हा सेवाकेंद्रात येऊ लागल्या. आता त्यांना घरातून होणारा विरोध न्यून झाला आहे. वर्ष २०२४ पासून त्या नियमितपणे आठवड्यातील एक दिवस सेवाकेंद्रात सेवेला येतात आणि एक दिवस एका साधिकेच्या समवेत प्रसाराच्या सेवेला जातात.

१ ए. त्यांचे यजमान किंवा मुलगा त्यांना वैयक्तिक व्ययासाठी जे पैसे देतात, त्यांतील काही भाग त्या अर्पण करतात.

१ ऐ. गुरूंप्रती भाव

१. त्या प्रतिदिन तिन्ही मोक्षगुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) सूक्ष्मातून नमस्कार करून आपली दिनचर्या चालू करतात.

२. त्या गुरुदेवांना प्रार्थना करून प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करतात.’

२. श्री. नंदकुमार कैमल, कोची सेवाकेंद्र, केरळ.

२ अ. सौ. मंजुळा राजेंद्रन् यांच्यात जाणवलेले पालट

१. ‘पूर्वी सौ. मंजुळाअक्का कुटुंबियांविषयी गार्‍हाणे करत असत. आता ते न्यून झाले आहे.

२. भक्तीसत्संग आणि आठवड्यातील अन्य सत्संग यांना उपस्थित रहाण्याची त्यांची तळमळ वाढली आहे. त्यामुळे अक्का साधकांना त्यांना ‘ऑनलाईन सत्संगा’ला जोडण्यासाठी संपर्क करतात आणि सत्संगाची ‘लिंक’ मिळेपर्यंत प्रयत्न करतात.

३. प्रवास करतांना बसमध्ये किंवा रिक्शामध्ये कुणी भेटले, तर अक्का त्यांना साधनेविषयी सांगतात.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.४.२०२६)