
छत्रपती संभाजीनगर – कु. अथर्व जगदीश मुंदडा याला १० वी मध्ये ९० टक्के गुण मिळाले आहेत. कु अथर्वने सांगितले की, ‘साधनेमुळे अभ्यास कसा करायचा ? अभ्यासाला बसायच्या अगोदर प्रतिदिन प्रार्थना आणि गुरुस्मरण कसे करायचे ? हे मला समजले. माझा असा भाव असायचा की, ‘गुरुदेवच माझ्याकडून सर्व करवून घेत आहेत आणि आज त्यांच्या कृपेनेच हे यश मला मिळाले.’
कु. अक्षरा जगदीश मुंदडा हिला १० वी मध्ये ९१ टक्के गुण

कु. अक्षरा मुंदडा हिला १० वी मध्ये ९१ टक्के गुण मिळाले. कु. अक्षराने सांगितले की, ‘परीक्षेचा अभ्यास करतांना मी सरस्वती माता, गणपति देवता आणि गुरुदेव यांना प्रार्थना करून बसायचे. गुरुदेवांचे स्मरण करून मी अभ्यास करायचे, गुरुदेवांच्या स्मरणाने माझा आत्मविश्वास वाढायचा आणि सकारात्मक राहून अभ्यास व्हायचा. प्रश्नपत्रिकेला अगोदर श्रीकृष्णाचे मानस मंडल घालत असे. उत्तरपत्रिका हातात आल्यावर त्यालाही श्रीकृष्ण नामाचे मानस मंडल घालत असे. प्रार्थना करून प्रश्नपत्रिका सोडवत असे. पेपर झाल्यावर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत असे. गुरुदेव सतत समवेत असतात, हा माझा भाव आहे आणि तेच सर्व करवून घेतात. साधनेमुळे अभ्यास कसा करायचा, हे मला समजले.’
कु. यज्ञेशा नवले हिला १० वीत ९१.८० टक्के गुण

इयत्ता दहावीच्या परीक्षेत कु. यज्ञेशा अश्विनी मोहन नवले या सनातनच्या साधक विद्यार्थिनीला ९१.८० टक्के गुण मिळाले. ती ‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय’, टिळक रोड, पुणे येथे शिकण्यास होती. गुरुपौर्णिमेच्या सेवेत सहभागी होणे, अध्यात्मिक उपाय करणे, पेपर लिहित असतांना श्री गणेश आशीर्वाद देत आहे, असा भाव ठेवणे या प्रकारचे प्रयत्न तिने केले.
कु. कार्तिक यतिन वाणी याला दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण !

छत्रपती संभाजीनगर – कु. कार्तिक यतिन वाणी याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवले आहेत. कु. कार्तिक नियमितपणे प्रार्थना, नामजप आणि गणपति अथर्वशीर्षाचे पठण करत असे. परीक्षेच्या कालावधीत प्रतिदिन ११ वेळा गणपति अथर्वशीर्ष म्हणत, तसेच नामजपादी आध्यात्मिक उपाय करून परीक्षेला जात असे. प्रसंगिक सेवेमध्ये तो सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावणे, धर्मसभा आणि गुरुपौर्णिमेच्या काळात फ्लेक्स प्रदर्शन लावणे अशा सेवा करत असतो. या यशाचे श्रेय त्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दिले आहे.
बारावीतील सुयश
नामजपासह अभ्यास केल्याने कु. स्वानंद भूषण देशमुख याला बारावीत ७८.८३ टक्के गुण
छत्रपती संभाजीनगर – कु. स्वानंद भूषण देशमुख याने इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७८.८३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. प्रतिदिन आठ ते नऊ घंटे अभ्यास करत असतांनाच त्याने नामजप साधनेलाही प्राधान्य दिले. परीक्षेच्या काळात पेपर लिहितांना स्वानंद श्री गणेशाला प्रार्थना करून उत्तरपत्रिकेवर बोटाने ‘श्री गणेशाय नमः’ असा नामजप लिहून पेपर सोडवत असे. त्यामुळे त्याला चांगले यश संपादन करता आले. त्याचा आध्यात्मिक स्तर ५१ टक्के आहे.
कु. रोहित यतिन वाणी याला बारावी आणि जेईई मेन्स परीक्षेत यश !

छत्रपती संभाजीनगर – कु. रोहित यतिन वाणी याने बारावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळवले असून जेईई मेन्स परीक्षेत ९५.६० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. कु. रोहित नियमितपणे प्रार्थना, नामजप आणि गणपति अथर्वशीर्षाचे पठण करत असे. परीक्षेच्या कालावधीत तो प्रतिदिन ११ वेळा गणपति अथर्वशीर्ष म्हणत असे, तसेच नामजपादी उपाय करून परीक्षेला जात असे. यासह तो साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणणे, ग्रंथप्रदर्शनासाठी ग्रंथांचा साठा आणणे आणि हिशोब झाल्यानंतर साठा परत नेऊन देणे, अशा सेवा नियमितपणे करत असतो. या यशाचे श्रेय त्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दिले आहे.
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !