कंटेनरमधील १३ लाख ५६ सहस्र रुपयांचे महिलांचे १ सहस्र १७० पोशाख गहाळ !

न्हावा शेवा बंदरातील घटना ! 

उरण – न्हावा शेवा बंदर परिसरात कंटेनरमधील १३ लाख ५६ सहस्र रुपयांचे महिलांचे १ सहस्र १७० पोशाख चोरण्यात आले आहेत. माल गहाळ झाल्याप्रकरणी कंटेनरचालक केंपाहीय्या जी. आणि त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चालक कंटेनर सोडून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.