स्वामींनी दिली रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

रामनाथी (गोवा) – हिंदु राष्ट्र बनवण्याचा पाया सनातन संस्थेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी रचला आहे. याची अनुभूती मी स्वत: आश्रमात आल्यावर घेतली. सनातनचे साधक हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित भावाने सेवारत आहेत. हिंदु राष्ट्राविषयी त्यांची तळमळ आणि भाव अद्भुत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा विडा उचलला आहे. ईश्वरी कृपेने लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, यासाठी सर्व शंकाराचार्य आणि महामंडलेश्वर यांच्या वतीने माझ्या सर्वांना शुभेच्छा. परब्रह्म गुरुदेवांच्या या महान कार्याला शतश: नतमस्तक होऊन नमन करतो. सनातन धर्माचे खरे योद्धा डॉ. आठवले आहेत. सनातनच्या आश्रमात मी जी अद्भूत अनुभूती घेतली, तशी अनुभूती मी जीवनात कधीच घेतली नाही. येथे हिंदु राष्ट्राचा पाया रचलेला आहे. सनातन आश्रम ही हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे. येथे कुठेच दिखावा नाही, हे एक नैसर्गिक वास्तव आहे, असे आशीर्वचन ‘नॅशनल सोसायटी फॉर हरे कृष्णा कॉन्सिअसनेस’ (नॅशकॉन) चे व्यवस्थापकीय अध्यक्ष श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी यांनी नुकतीच येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर दिले.
स्वामीजी ‘कन्हैया आश्रय गोशाळे’चे अध्यक्ष आहेत, तसेच ते ‘विश्वशांती सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सिअसनेस’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासमवेत त्यांचे काही अनुयायी उपस्थित होते. ‘सनातन प्रभात प्रसारमाध्यम समूहा’चे संपादक श्री. योगेश जलतारे यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म कार्याची त्यांना ओळख करून दिली. ‘सनातन प्रभात’चे उपसंपादक श्री. उमेश नाईक यांनी महंत राधाकृष्ण स्वामी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून, तसेच सनातनचे ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या वेळी सनातनचे काही साधक उपस्थित होते.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !