काही मासांपूर्वी नाशिकमध्ये पार पडणार्या सिंहस्थ महाकुंभपर्वासाठी वृक्षतोड होणार; म्हणून कथित पर्यावरणप्रेमी वृक्षांना मिठ्या मारून ‘वृक्ष तोडू देणार नाही’, असा कांगावा करत प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यात काही अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी बहुसंख्येने सामील झाले होते.

सनातन हिंदु धर्मामध्ये नदीला माता मानून तिची पूजा केली जाते. पिंपरी-चिंचवड येथील पवना या अत्यंत पवित्र अशा नदीच्या पात्राजवळील कसायी, रासायनिक कारखानदार आणि रहिवासी यांनी मांसाचे अन् हाडाचे तुकडे, रसायनमिश्रित दूषित पाणी, प्लास्टिकचे तुकडे आणि अनेक दूषित पदार्थ सर्रासपणे नदीत फेकून दिलेले आढळतात; परंतु अशा वेळी वृक्षाला मिठ्या मारणारे अभिनेते, कथित पर्यावरणप्रेमी आणि समाजसुधारक कुठेही आढळत नाहीत. बरे हा प्रकार केवळ आता चालू झालेला नसून गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास चालत आहे. यामध्ये कसायी आणि कारखानदार यांना विरोध करून पर्यावरणवाद्यांना त्याचे किती परिणाम भोगावे लागतील, याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच सर्वांत ‘सॉफ्ट टार्गेट’ (सौम्य लक्ष्य) असलेल्या हिंदु धर्माच्या श्रद्धेवर ते कथित पर्यावरणप्रेमाचा कंड क्षमवून घेतात.
– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई (१४.५.२०२६)

शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !