
१. ‘मागील २५ – २६ वर्षांमध्ये गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) साधकांना वेगवेगळे नामजप करायला सांगितले आणि साधकांकडून ते करूनही घेतले. ‘काही दिवसांपासून माझ्याकडून उपायांसाठी करत असलेला नामजपाच्या व्यतिरिक्त इतर वेळी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप दिवसभर आणि रात्री कधीही जाग आली, तरी चालू आहे’, हे माझ्या लक्षात यायचे.

२. आता गुरुदेवांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप अधिकाधिक वेळा करायचा आहे’, असे सांगितले आहे. आरंभीचे २ – ३ दिवस मी झोपेतून कधीही जागी झाले, तरी माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हाच नामजप चालू व्हायचा. त्या वेळी मला ‘आता मला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप करायचा आहे’, याची जाणीव व्हायची आणि माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप चालू व्हायचा.
३. आता मला जाग आली की, माझ्याकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप आपोआपच चालू होतो.
यातून ‘गुरुदेवांचा संकल्प झाला की, ती गोष्ट आपोआपच होत असते’, हे माझ्या लक्षात आले आणि गुरुदेवांच्या संकल्पातील सामर्थ्य मला अनुभवायला मिळाले.’
– सौ. अंजली अजय जोशी (वय ६३ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (६.४.२०२६)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती