
‘सध्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती साधकांच्या श्रद्धेचे भंजन करून त्यांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी ‘शब्दशक्ती’द्वारे मोठ्या प्रमाणात सूक्ष्मयुद्ध करत आहेत. लिखाण आणि वाणी यांमधील शब्दांच्या माध्यमातून संस्था, संत आणि साधक यांविषयी नकारात्मकता पसरवली जात असल्याच्या घटना घडत आहेत. या सूक्ष्मातील लढ्यात वाईट शक्ती समाजातील विरोधक, तसेच नकारात्मक विचारांचा प्रभाव असलेले साधक यांना माध्यम करून त्यांचे लिखाण आणि वाणी यांतून अन्य साधकांमध्ये विकल्प निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. साधकाच्या श्रद्धेवर घाव घातला की, त्याच्या मनात विकल्प निर्माण होऊन त्याची साधनेत अधोगती होते.
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवणार्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या षड्यंत्राला बळी न पडता जोमाने स्वतःची साधना वाढवा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.३.२०२६)
| सनातन संस्था, सनातनचे संत आणि साधक यांच्याविषयी विकल्प पसरवणारे आक्षेपार्ह लिखाण किंवा बोलणे कुणी करत असल्यास त्याविषयी आपल्या क्षेत्राच्या उत्तरदायी धर्मप्रचारक संतांना कळवावे.
– विश्वस्त, सनातन संस्था. |
साधकांना सूचना : दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : संस्कारमूल्ये
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’