
भोजशाळेचा निर्णय हे केवळ मंदिराचे नव्हे, तर ‘सभ्यतेचे विधान’ ! – लेखक संदीप सिंह

मुंबई – भोजशाळा निकालाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांसंबंधीचे प्रसिद्ध लेखक संदीप सिंह यांनी हिंदू वारसा आणि मंदिर पुनरुत्थान यांविषयी ‘सनातन प्रभात’कडे परखड मते व्यक्त केली आहेत. ‘टेंपल इकॉनॉमिक्स’ आणि ‘अ डिकेड फॉर मंदिर’ या ग्रंथांचे लेखक संदीप सिंह यांच्या मते, भोजशाळेची मुक्ती ही केवळ एका जागेची पुनर्प्राप्ती नसून ते एक ‘सभ्यतेचे विधान’ आहे.
सिंह पुढे म्हणाले की…,
निष्क्रीयता सोडा
हिंदूंनी आता केवळ प्रेक्षक बनून रहाणे थांबवले पाहिजे. आपला वारसा, ओळख आणि पवित्र स्थळांच्या रक्षणासाठी हिंदूंनी आता खंबीरपणे उभे रहाण्याची वेळ आली आहे.
मंदिरांचा पुनर्दावा !
जे प्रत्येक मंदिर उद्ध्वस्त केले गेले, ज्यावर अतिक्रमण झाले किंवा जिथे भाविकांना प्रवेश नाकारला गेला, त्या प्रत्येक मंदिरावर पुन्हा हक्क मिळवून त्याचे पुनर्निर्माण केले पाहिजे.
ऐतिहासिक सत्याचा विजय !
इतिहासातील विकृती आता लपवून ठेवता येणार नाहीत. मंदिर, परकीय आक्रमणे आणि सांस्कृतिक विध्वंसाचे सत्य आता सार्वजनिकरित्या लोकांच्या समोर येत आहे.
हिंदु एकता अनिवार्य
हिंदूंमध्ये जाती, प्रांत किंवा भाषेच्या नावावर होणारे विभाजन हे आपल्या सभ्यतेच्या सातत्याला दुर्बल करते. त्यामुळे सभ्यतेच्या रक्षणासाठी हिंदु एकता ही काळाची आवश्यकता आहे.
धर्माचे पुनरुज्जीवन
मंदिरांचे पुनरुज्जीवन हे केवळ धार्मिक कार्य नाही. हे धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी, सांस्कृतिक आत्मविश्वास जागवण्यासाठी, ऐतिहासिक न्याय मिळवण्यासाठी आणि राष्ट्रीय स्वाभिमान जपण्यासाठी आवश्यक असलेले पाऊल आहे.
गुरुदेव एका दिव्य शक्तीच्या स्वरूपात पाठीशी उभे होते ! – भोजशाळा मुक्ती आंदोलनाचे तत्कालीन प्रमुख स्वामी राम चैतन्यजी (नवलकिशोर शर्मा)
ही एक दिव्य साधना आहे; जेव्हा कुणीही समवेत नव्हते, सर्वांनी साथ सोडली होती, तेव्हा आई भगवतीच्या या यज्ञामध्ये तुमच्यासारखे सोबती (हिंदु जनजागृती समिती) आणि प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मार्गदर्शक अन् आशीर्वाद दात्याच्या रूपाने पाठीशी उभे राहिले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नाहीत. प.पू. गुरुदेव एका दिव्य शक्तीच्या स्वरूपात पाठीशी उभे होते, हा त्याच शक्तीचा प्रसाद (आशीर्वाद) आहे ! |
भोजशाळा आता पूर्णतः हिंदूंचेच मंदिर ! – याचिकाकर्ते कुलदीप तिवारी

लक्ष्मणपुरी (उत्तर प्रदेश) – भोजशाळा प्रकरणातील ऐतिहासिक निकालावर आनंद व्यक्त करतांना या प्रकरणातील प्रमुख याचिकाकर्ते आणि लक्ष्मणपुरी येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. कुलदीप तिवारी यांनी न्यायालयासमोर मांडलेले पुरावे आणि निर्णयाचे सविस्तर तपशील मांडले आहेत. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना ते म्हणाले की, हा निकाल म्हणजे तर्क आणि तथ्य यांच्या आधारे मिळालेला विजय आहे.
२ याचिका आणि कायदेशीर लढा
या प्रकरणाबद्दल माहिती देतांना तिवारी म्हणाले की, आमच्या वतीने दोन याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. पहिली याचिका ‘कुलदीप तिवारी विरुद्ध केंद्र सरकार’ (क्रमांक १०४८४) आणि दुसरी याचिका ’हिंदू फ्रंट फॉर जस्टिस विरुद्ध केंद्र सरकार’ (क्रमांक १०४९७) होती. या दोन्ही याचिका २ मे २०२२ या एकाच दिवशी प्रविष्ट करण्यात आल्या होत्या.
ऐतिहासिक आणि शास्त्रीय पुरावे
न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांबद्दल बोलतांना तिवारी यांनी स्पष्ट केले की, हा लढा ४ वर्षे चालला. या वेळी हिंदू समाजाकडून मध्यप्रदेश सरकारचे राजपत्र, कायदेशीर कागदपत्रे आणि अनेक महत्त्वाची पुस्तके न्यायालयात सादर करण्यात आली. ‘आम्ही राजा भोज लिखित ‘समरांगण सूत्रधार’ हे पुस्तक न्यायालयात दिले. हे पुस्तक परमार वंशाची वास्तुकला कशी असावी, यावर आधारित आहे. यामध्ये मूर्तींची रचना, मंदिराची रचना आणि भवनांचे स्वरूप स्पष्ट केले आहे,’ असे तिवारी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘भोजशाळा हे केवळ मंदिर नसून ते एक विख्यात संस्कृत विद्यापीठ (सरस्वती कंठाभरण) होते, जिथे ५०० हून अधिक आचार्य शिक्षण देत असत. राजा भोज यांना सरस्वती मातेचे वरदपुत्र मानले जाते, त्यांनी स्वतः ८४ ग्रंथांची रचना केली आहे. आम्ही मेरुतुंग यांनी वर्ष १३०५ मध्ये लिहिलेले ‘प्रबंध चिंतामणि’ आणि ‘आर्ट ऑफ परमार ऑफ माळवा’ यांसारखे अनेक पुरावे दिले, जे न्यायालयाने स्वीकारले.’
न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
न्यायालयाच्या निकालाचे वाचन करतांना तिवारी यांनी माहिती दिली की, सुमारे दीड महिना प्रतिदिन २-२ घंटे यावर सुनावणी चालली. न्यायालयाने स्पष्ट केले की, पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध होते की, भोजशाळा हे हिंदू मंदिरच आहे. न्यायालयाने वर्ष २००३ चा पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा आदेश रहित केला, ज्यामध्ये मुसलमानांना नमाजपठण करण्याची अनुमती देण्यात आली होती. न्यायालयाने हा आदेश घटनाविरोधी ठरवला असून आता तिथे नमाजपठणावर पूर्ण बंदी घातली आहे. आता हे पूर्णतः हिंदूंचे मंदिर झाले आहे, मुसलमानांचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे सांगत तिवारी यांनी निकालावर समाधान व्यक्त केले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करणार ! – Bengal CM Suvendu Adhikari
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati