शहराच्या वेशीवर ११८ हेक्टर जागेवर वाहनतळाचे नियोजन !

नाशिक – वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने देशभरातून येणारे भाविक आणि साधू-महंत यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने वर्ष २०१५ च्या तुलनेत यंदा साधूग्रामचा विस्तार तिपटीने वाढवला आहे. १ सहस्र एकर जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त साधूग्राम उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासह ९ प्रमुख मार्गांवरून नाशिक शहरात येणार्या वाहनांसाठी शहराच्या वेशीवर ११८ हेक्टर जागेवर वाहनतळ उभारण्यात येणार आहे. येथून भाविकांना रामकुंड, तपोवन, लक्ष्मीनारायण घाट, राम संगम आणि दशरथ घाट येथे जाणे सोयीचे ठरणार आहे.
Sadhu Gram to be set up over 1,000 acres of land for the Nashik Simhastha Kumbha Mela
Parking facilities planned over 118 hectares at the city’s outskirts
More than 5 crore devotees are expected to attend.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा pic.twitter.com/ALlS5UvZ0R
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 17, 2026
१. नाशिकच्या कुंभपर्वाचे सरकारकडून मोठ्या प्रमाणात ‘ब्रँडिंग’ (ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया) चालू असल्याने ५ कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे.
२. साधूग्राममध्ये अंतर्गत रस्ते, मलवाहिका, जलवाहिनी आणि विद्युतीकरण यांचे मोठे जाळे उभारण्यात येईल. भाविकांसाठी निवारा शेड, व्यापारी संकुल, पोलीस चौकी, दवाखाने, अग्नीशमन शेड आणि सेक्टर कार्यालय उभारले जाणार आहेत. साधूग्राम परिसराचे विशेष सुशोभीकरणही करण्यात येणार आहे.
३. नाशिक महानगरपालिकेला साधूग्रामसाठी तपोवन, नांदूर आणि आगरटाकळीत ७८४ एकर ते १ सहस्र एकर खासगी भूमी संपादित किंवा अधिग्रहित करायची आहे; पण भूमी मालकांनी कायमस्वरूपी भूसंपादनास विरोध केला. महानगरपालिकेने शेतकर्यांना ५० टक्के टी.डी.आर्. (हस्तांतरणीय विकास हक्क) आणि ५० टक्के रोख मोबदला देण्याचा दिलेला प्रस्ताव भूमी मालकांनी फेटाळला आहे. ‘सध्याच्या बाजारभावाप्रमाणे १०० टक्के रोख मोबदला मिळावा’, अशी त्यांची मागणी आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin