
नसरापूर येथील घटनेनंतरच्या आठवड्यात महाराष्ट्रात लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडल्याची वृत्ते आली. जेव्हा एखादे अत्याचार किंवा आत्महत्या या प्रकारचे प्रकरण गाजते, तेव्हा तशाच प्रकारच्या गोष्टी घडल्याची वृत्ते लगोलग येत रहातात. नियमित वृत्ते वाचणार्यांनी हे बर्याचदा अनुभवले असेल. अगदी लोकलगाड्या किंवा विमान अपघात यांच्या संदर्भातही हे आपण अनुभवत आलो आहोत. कर्णावतीच्या विमान अपघातानंतर विमानाच्या यंत्रणेत बिघाड झाल्याची वृत्ते येऊ लागली. लव्ह जिहाद प्रकरणी श्रद्धा वालकरचे ३२ तुकडे करून शीतकपाटात ठेवल्याच्या प्रकरणानंतर अशा प्रकारच्या घटना इतरत्रही घडल्या. देहलीत एका गल्लीत प्रेमप्रकरणातून एका तरुणीला रस्त्यात भोसकल्यानंतर अन्यही असे प्रकार झाले. इतकेच काय, अनेक वर्षांपूर्वीच्या निर्भया प्रकरणानंतर काही दिवसांत त्याच प्रकारची प्रकरणे समोर आली होती. ही नेमकी मानसिकता काय ? किंवा यामागे खरोखरच काही आधिभौतिक कारणे आहेत किंवा विज्ञानाच्या भाषेत सांगायचे, तर काही नकारात्मक लहरींचा त्रास आहे ?, याचा शोध तज्ञांनी घेतला पाहिजे. कदाचित् अत्याचार, चोरी किंवा आत्महत्या करण्याचे तंत्र विकृत प्रवृत्तींना लक्षात आल्याने तसे गुन्हे वाढतात.

काही अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दुसरी आणखी एक दाट शक्यता, म्हणजे समाजात अशा प्रकारचे भयंकर क्रूर पद्धतीने केले जाणारे अन्याय, अत्याचार, खून, बलात्कार हे समाजात घडतच आहेतच; परंतु ते तेवढ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. एखाद्या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाल्यावर इतरांकडून होणारे अत्याचार बाहेर काढण्याचे धैर्य पीडितांना मिळते. जसे अगदी नाशिकच्या खरात प्रकरणानंतरही अनेक भोंदूंची वृत्ते आली आणि येत आहेत. ‘टी.सी.एस्.’ आस्थापनाच्या प्रकरणानंतरही अन्य आस्थापनांच्या संदर्भातील आघातांची वृत्ते येऊ लागली.
प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखिका सौ. शेफाली वैद्य यांनी त्यांच्या ‘फेसबुक’वरील लिखाणामध्ये एक मार्मिक गोष्ट सांगितली आहे. काही वर्षांपूर्वी त्या अमेरिकेत असतांना त्यांनी त्यांच्या ३ मुलांना जन्म दिल्यावर तेथील परिचारिकेने त्यांना ‘मुलांची काळजी कशी घ्यायची ?’, यापेक्षा ‘लहान मुलांना जगापासून सुरक्षित कसे ठेवायचे ?’, याविषयीच्या अनेक सूचना दिल्या, उदा. मुलांना एकही क्षण दृष्टीआड होऊ द्यायचे नाही, इतरांना त्यांच्या किती जवळ येऊ द्यायचे ? इत्यादी. त्या वेळी त्यांना वाटले की, भारतात या गोष्टींची आवश्यकता काय ?; परंतु आज भारतात अमेरिकेप्रमाणेच अवस्था निर्माण झाली आहे, हे कटु सत्य त्यांनी मांडले आहे. भारतात होणार्या लहान मुलांवरील अत्याचारांची वारंवारता रोखण्यासाठी एक तात्कालीक उपाय म्हणून तरी त्यांना सांभाळणार्यांनी त्यांच्यावर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवणे क्रमप्राप्त आहे !
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !