सतर्क हिंदूकडून तक्रार प्रविष्ट झाल्याने प्रकार उघड !

मुंबई – डोक्यावर हात ठेवून ‘दुर्धर व्याधी येशू ठीक करील’, असे सांगून हिंदूंची फसवणूक करणार्या ७ ख्रिस्ती धर्मप्रचारकांना अटक केली असून त्यांच्या विरोधात मालाड पोलीस ठाण्यात ‘महाराष्ट्र नरबळी आणि अन्य अमानुष अनिष्ट अन् अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रमेश गुप्ता, उषा गुप्ता, अमन दुबे, मुकेश यादव अशी ख्रिस्ती धर्मप्रचारकांची नावे आहेत. (बाटून ख्रिस्ती झाल्यावर स्वतःची हिंदु नावे तशीच ठेवणारे कावेबाज बाटगे ख्रिस्ती ! – संपादक) ३ महिला अज्ञात आहेत.
१. सांताक्रूझ (पूर्व) येथील आशा उपाध्याय (वय ४५ वर्षे) यांनी या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्या गृहिणी असून मागील ७ वर्षांपासून त्यांना ‘थायरॉईड’ आणि ‘उच्च रक्तदाब’ यांचा त्रास आहे.
२. त्यांच्या संपर्कातील उषा गुप्ता नावाच्या महिलेने ३ अनोळखी महिलांसह ८ मे या दिवशी आशा यांच्या घरी येऊन ‘येशूच्या प्रार्थनेने सर्व व्याधी ठीक होतील’, असे सांगून प्रत्येक रविवारी मालाड (पश्चिम) येथील एका शाळेत होणार्या प्रार्थनासभेला येण्यास सांगितले.
३. आशा उपाध्याय यांनी हा प्रकार मुलाला सांगितल्यावर तो त्यांना १० मे या दिवशी मालाडमधील शाळेत घेऊन गेला. तेथे रमेश गुप्ता हा लोकांच्या डोक्यावर हात ठेवून व्याधी ठीक होत असल्याचे सांगत होता. ते पाहून फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवणे या प्रकारांच्या विरोधात मुलाने पोलिसांमध्ये तक्रार प्रविष्ट केली.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री