सेवाभावी आणि देवाच्या अनुसंधानात असलेले येडशी (जिल्हा धाराशिव) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. उत्तरेश्वर भगवान इंगळे (बाप्पा) (वय ७२ वर्षे)

‘येडशी (जिल्हा धाराशिव) येथील श्री. उत्तरेश्वर भगवान इंगळे (बाप्पा) (वय ७२ वर्षे) यांची साधकांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. उत्तरेश्वर भगवान इंगळे (बाप्पा)

१. श्री. राहुल कदम, विटा, जिल्हा सांगली.

१ अ. सेवाभाव

१ अ १. पू. दीपाली मतकर यांनी सेवेसाठी बोलावल्यावर लगेच जाणे : ‘एकदा इंगळेकाका एका कार्यक्रमाच्या ठिकाणी असतांना त्यांना पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या संत, वय ३७ वर्षे) यांचा भ्रमणभाष आला. पू. दीपालीताईंनी इंगळेकाकांना सेवेला येण्याविषयी विचारले. त्या वेळी काका कार्यालयातून लगेच सेवेसाठी सोलापूर येथे गेले.

१ अ २. सेवाकेंद्रांत सेवेसाठी जाणे : काका सेवाकेंद्रांत सेवेसाठी जातात. काकांचे कुटुंबीय शेतीच्या कामांमुळे सेवेसाठी जाऊ शकत नाही; मात्र ते काकांना सेवेसाठी नेहमी साहाय्य करतात.

१ अ ३. काका आणि त्यांचा नातू यांनी महाशिवरात्रीनिमित्त ग्रंथप्रदर्शन लावले होते.

१ अ ४. काकांची सेवेसाठी कुठेही जायची सिद्धता असते.

१ आ. त्यागी वृत्ती : काका त्यांच्या शेतात पिकलेले धान्य नेहमी सेवाकेंद्रात देतात. काका येडशीहून मिरज येथील सनातनच्या आश्रमातही धान्य घेऊन येतात.

१ इ. ऐकण्याची वृत्ती : उत्तरदायी साधकांनी काकांना काही सांगितल्यावर काका लगेच ऐकतात. काकांच्या मनात कोणताही प्रश्न नसतो. त्यांचा ‘सेवा महत्त्वाची’, असा दृष्टीकोन असतो.

१ ई. गुरुदेवांप्रती अपार भाव : एकदा काका मला म्हणाले, ‘‘माझ्यात पूर्वी पुष्कळ स्वभावदोष होते; मात्र मी साधनेला प्रारंभ केल्यापासून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने माझ्यात पुष्कळ पालट झाले आहेत.’’

१ उ. साधकाच्या भाचीच्या विवाहात साहाय्य करणे : इंगळेकाका माझ्या भाचीच्या विवाहप्रसंगी साहाय्य करण्यासाठी एक दिवस आधी आले होते. काका दुपारी महाप्रसादाच्या वेळेत घरी आले होते. तेव्हा ते घरी न थांबता डबा घेऊन कार्यालयात गेले. ते दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत कार्यालयातील स्वयंपाकघरातच सेवारत होते. त्यांचा हा सेवाभाव पाहून त्यांच्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळाले. मला श्री गुरुंप्रती कृतज्ञता वाटली.

१ ऊ. एकदा माझ्या बहिणीच्या घरी इंगळेकाका शांत बसून होते. त्या वेळी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला ‘ते अंतरातून देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवले.’

२. सौ. कृपांजली प्रमोद जगताप, बार्शी, जिल्हा सोलापूर.

२ अ. व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणे : ‘माझे पती श्री. प्रमोद जगताप यांचे धाराशिव जिल्ह्यातील येडशी या गावी स्थानांतर झाले. तिथे गेल्यानंतर आम्हाला सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली. तिथे प्रसार करत असतांना माझी इंगळे कुटुंबियांशी भेट झाली. श्री. इंगळेकाका (बाप्पा) हे नेहमी शेतात असायचे. ‘इंगळेकाकांचा स्वभाव कडक आहे’, असे त्या वेळी त्यांचे कुटुंबीय सांगत असत. हळूहळू बाप्पांनी साधना समजून घेतली आणि ते ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी येऊ लागले. नंतर बाप्पांच्या स्वभावात पुष्कळ पालट झाला. ते व्यष्टी साधनाही पुष्कळ श्रद्धेने आणि तळमळीने करू लागले. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या सर्व लोकांना संपर्क करून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अर्पणही मिळू लागले. त्यांचे वय ७२ वर्षे आहे, तरीही ते कोणतीही सेवा करायला तत्पर असतात.

२ आ. प्रत्येक कृती सेवाभावाने करणे : सेवा कोणतीही असू दे, बाप्पा ती सेवा लगेच स्वीकारतात. त्यांना भ्रमणभाष केल्यावर ‘काय करत आहात ?’, असे विचारल्यावर ‘शेतात सेवा करत आहे’, असे ते सांगतात. ते शेतातील कामेही सेवाभावानेच करतात.

बाप्पांनी मला मुलगी मानले आहे. त्यांनी माझ्या मुलीच्या लग्नातही पुढाकार घेऊन सेवा केली. प्रत्येक गोष्टीत त्यांचा सेवाभाव दिसून येतो.

२ इ. ते शांत आणि संयमी आहेत.

२ ई. ‘बाप्पा सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे वाटते. कितीही कठीण प्रसंग असला, तरीही ते शांत राहून ईश्वरेच्छा समजून स्वीकारतात आणि सकारात्मक रहातात. बाप्पांची साधनेची तळमळ आणि त्यांची सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवर असलेली श्रद्धा पाहून माझी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होते.’

३. सौ. गीतांजली देसाई, तासगाव, जिल्हा सांगली.

३ अ. ‘माझ्या बहिणीच्या मुलीच्या विवाहाच्या वेळी मला बाप्पांना भेटण्याचा योग आला. त्यांना भेटल्यावर ‘ते सतत ईश्वराच्या अनुसंधानात आहेत आणि त्यांचा अंतर्मनातून नामजप चालू आहे’, असे मला जाणवले.’

४. सौ. वीणा राहुल कदम, विटा, जिल्हा सांगली.

४ अ. ‘बाप्पांशी बोलतांना माझी भावजागृती होते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १४.३.२०२६)                 !