
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी योगमार्गांची तुलना जेव्हा समाजासमोर मांडली, तेव्हा त्यांनी ‘भक्तीयोग श्रेष्ठ’, हे सांगतांना ‘भक्त प्रल्हाद हा भक्तश्रेष्ठ आहे’, असेही सांगितले होते. भक्त प्रल्हादाच्या पौराणिक कथांतून आपल्याला ‘भक्ती कशी करावी ?’, याचे दिशादर्शन होते आणि साधक त्यानुसार साधनेचे प्रयत्न करतात. साधनेचे प्रयत्न, प्रत्येकाचे प्रारब्ध-संचित यांनुसार साधक भक्तीच्या पुढच्या पुढच्या टप्प्याला पोचतो आणि भक्तीमार्गाने देवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधना सांगतांना साधनेतील १० प्रमुख तत्त्वे मांडतांना साधकांची प्रकृती, त्यांचे स्वभावदोष आणि अहं, तसेच त्यांच्यात देवाप्रती असणारा उपजत भाव यांचाही अभ्यास करून साधनेसाठी विविध मार्ग उपलब्ध करून दिले.

१. स्वभावदोष आणि अहं
सध्याच्या काळात स्वभावदोष आणि अहं हे तीव्र असणार्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ग्रंथ आणि लेखस्वरूपात ही प्रक्रिया सर्वांसाठी उपलब्ध करून दिली. प्रत्येकाच्या मनात या प्रक्रियेचे महत्त्व बिंबवून त्यांना आलेल्या अनुभूती दैनिकात छापल्या आणि एकाच वेळी अनेकांच्या मनात ही प्रक्रिया गांभीर्याने राबवण्याचे बीज पेरले.
२. भावजागृती

ज्यांच्यात उपजत देवाप्रती भाव अधिक आहे, त्यांच्या मनात भक्तीचे विचार मनात घालून त्यांचा भाव वृद्धींगत केला आणि साधकांमध्ये भाव जागृत करण्याचे कार्य त्यांच्याकडे साधना म्हणून सोपवले.
३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, तसेच भाववृद्धीसाठी प्रयत्न
सनातनच्या अष्टांग साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं तीव्र असणार्यांसाठी ही प्रक्रिया राबवतांना त्याच वेळी त्यांच्यामध्ये भाव असणारे साधक भावाचे बीज वृद्धींगत करू लागले. त्यामुळे अनेकांचा सत्सेवा (कर्मयोगाच्या माध्यमातून) करतांना ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०) म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे योग साधणे’ यासह बुद्धीने स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन (ज्ञानयोग) आणि भाववृद्धीसाठी प्रयत्न (भक्तीयोग) करून त्यांच्यामध्ये देवाप्रती भाव वृद्धींगत करतात.
गुरुकृपायोगानुसार साधना केल्यामुळे १३ मे २०२६ पर्यंत सनातनचे १३४ साधक ७० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाले आहेत आणि १,०२६ साधकांनी ६० टक्के ते ६९ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते संतपदाकडे वाटचाल करत आहेत.
भक्त प्रल्हाद याच्या उदाहरणातून अनेकांना ‘भक्तीयोग कसा साध्य करायचा ?’, याचा परिपाठ मिळाला; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘भक्त प्रल्हादाने साधना करतांना काय अनुभवले ?’, हे साधकांना अनुभवण्यास दिले, तसेच ‘त्यांनी अनेक भक्त प्रल्हाद निर्माण केले’, असे म्हणणे योग्य होईल. यांतील काही व्यक्त भावात, तर काही अव्यक्त भावात आहेत.
– सौ. छाया नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.२.२०२६)
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !