प्रति गुरुवारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतील सत्संगानंतर अनेक साधकांचे साधनेविषयी चिंतन होते. श्री. अरुण कुलकर्णी यांनी भक्तीसत्संगात सांगितल्याप्रमाणे कृती केल्यानंतर त्यांना झालेल्या लाभाविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

१. भक्तीसत्संगात मार्गदर्शन केल्यानुसार व्यक्तीने ऐकण्याची वृत्ती वाढवल्यास तिच्यातील ‘संयम, अंतर्मुखता, स्थिरता, इतरांना समजून घेणे, शिकण्याची वृत्ती’ इत्यादी गुणांमध्ये वाढ होणे

भक्तीसत्संगात ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि कृती करणे’ या साधनेतील पंचसूत्रींविषयी मार्गदर्शन केले जात आहे. ‘ऐकण्याची वृत्ती’ या सूत्राची व्याप्ती पुष्कळ मोठी असून ती अनेक पैलूंवर अवलंबून आहे. आपण ऐकण्याची वृत्ती वाढवल्यावर आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होते. आपली ऐकण्याची वृत्ती वाढली, तर आपल्या ‘संयम, अंतर्मुखता, स्थिरता, इतरांना समजून घेणे, शिकण्याची वृत्ती’ इत्यादी गुणांमध्ये वाढ होते.
२. शालेय अभ्यासात ‘ऐकण्याची वृत्ती’, ‘विचारण्याची वृत्ती’ इत्यादी सूत्रांचा समावेश केल्यास मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास होऊ शकतो !
मी ‘ऐकण्याची वृत्ती’ याविषयी चिंतन करत असतांना मला वाटले, ‘ऐकण्याची वृत्ती’, ‘विचारण्याची वृत्ती’ या एकेका सूत्रावर एवढे चिंतन करणे, म्हणजे एखाद्या विषयावर पीएच्.डी. (विद्यावाचस्पती पदवी) मिळवण्यासारखेच आहे. शालेय अभ्यासात या सूत्रांचा समावेश केल्यास अनेक मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास होऊ शकतो.’
या दृष्टीने ‘भक्तीसत्संगात ज्या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे, ते विषय ईश्वरी राज्यात पात्र ठरण्यासाठी मार्गदर्शक आहेत’, असाही विचार माझ्या मनात आला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेले विचार मी त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अरुण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (१३.२.२०२६)
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!