Saifuddin Khan : ममता सरकार पुन्हा निवडून आल्यास हिंदूंच्या तोंडात गोमांस कोंबणार !  

तृणमूल काँग्रेसचा गुंड सैफुद्दीन खान याने दिली होती धमकी

तृणमूल काँग्रेसचा गुंड सैफुद्दीन खान

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातील मेमारी शहरात तृणमूल काँग्रेसचा गुंड सैफुद्दीन खान याच्यावर हिंदूंना बलपूर्वक गोमांस खाऊ घालण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला आहे. पत्रकार सुभी विश्वकर्मा यांनी ‘एक्स’वर एक व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.

या व्हिडिओमध्ये एका स्थानिक हिंदु व्यक्तीने सांगितले, ‘सैफुद्दीन याने सांगितले होते की, ममता बॅनर्जी यांचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हिंदूंना गोमांस खाऊ घालणार, अशी धमकी दिली होती.’ (भारतात अल्पसंख्य असुरक्षित असल्याचा टाहो फोडणार्‍या निधर्मीवादी, साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांना मुसलमानांची ही झुंडशाही दिसत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)

१. स्थानिक हिंदूंनी आरोप केला की, ते सैफुद्दीनच्या गुंडगिरीमुळे बर्‍याच काळापासून त्रस्त होते. तृणमूल काँग्रेसचे सरकार असतांना तो त्यांना छळत असे.

२. निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पराभवानंतर सैफुद्दीन पसार झाल्याचे वृत्त आहे.

३. स्थानिकांनी भाजपचे विजयी उमेदवार मानव गुहा यांच्याकडे मागणी केली आहे की, सैफुद्दीन याला कुठल्याही परिस्थितीत मेमारीमध्ये येऊ दिले जाता कामा नये.

संपादकीय भूमिका

ममता बॅनर्जी यांची राजवट म्हणजे तुघलकी राजवट होती, हेच यातून सिद्ध होते !