सौदी अरेबियातून पाठवण्यात आलेला पंखा दानात मिळाल्याचे उघड
कुशीनगर (उत्तरप्रदेश) – येथील एका मदरशामध्ये लावण्यात आलेला पंखा पाकिस्तानी आस्थापनाचा असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. मदरशातील पंखा दुरुस्त करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पंख्यावर ‘मेड इन पाकिस्तान’ (पाकिस्ताननिर्मित) असे लिहिल्याचे दिसले. त्याने याचे छायाचित्र काढून सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यावर पोलिसांनी चौकशी चालू केली.
कुशीनगर जिल्ह्यांचे प्रांत अधिकारी जयंत यादव म्हणाले, ‘‘पोलिसांनी मदरशाचा व्यवस्थापक युनुस अन्सारी याची चौकशी केली. त्याने हा पंखा एका स्थानिक रहिवाशाने दान केल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्या रहिवाशाला शोधून काढत त्याचीही चौकशी केली. या रहिवाश्याने सांगितले की, त्याच्या सौदी अरेबियामध्ये स्थायिक असलेल्या मुलाने तो पाठवला होता. वर्ष २०२३ मध्ये सदर पंखा मदरशाला देण्यात आला. यानंतर पोलिसांनी सदर मुलाशीही संपर्क साधला. त्याने सांगितले की, वर्ष २०२० मध्ये सदर पंखा सौदी अरेबियात विकत घेतला होता. त्यानंतर तो त्याच्या वडिलांसाठी भारतात पाठवला. मुलाने पंखा विकत घेतल्याचे देयकही सादर केले. आम्ही या देयकाची तपासणी करत आहोत. तसेच पंखा भारतात आणतांना सीमा शुल्क भरले गेले होते का का? हेही तपासले जात आहे.’’
मदरशामधील शिक्षक ममेराजुद्दीन अन्सारी यांनी सांगितले की, पंख्यावर ‘मेड इन पाकिस्तान’ लिहिले आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. मदरसा वर्ष १९९४ पासून लोकवर्गणीतून चालवला जात आहे.

पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !