शांत, नम्र आणि देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कोथरूड, पुणे येथील कु. अद्वैत सागर पाटील (वय १५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अद्वैत सागर पाटील हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. अद्वैत सागर पाटील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२६ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
-सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.५.२०२६)

कु. अद्वैत सागर पाटील याची त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अद्वैत सागर पाटील
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. स्वाती पाटील (कु. अद्वैतची आई), कोथरूड, पुणे.

सौ. स्वाती पाटील

१ अ. शांत आणि नम्र : ‘अद्वैत लहानपणापासूनच शांत आणि नम्र आहे. त्याला कुणी रागावून बोलले, तरी तो त्यांच्याशी शांतपणे बोलतो.

१ आ. काटकसरी : अद्वैत अधिक मूल्य असलेल्या वस्तू विकत घेत नाही.

१ इ. इतरांना साहाय्य करणे

१. तो घरात सर्वांना आनंदाने साहाय्य करतो.

२. तो कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे पाय चेपून देतो, तसेच त्यांच्या पायाला तेलाने मर्दन करणे इत्यादी सेवाभावाने करतो.

१ ई. व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात सांगितलेली सूत्रे कृतीत आणणे : अद्वैत व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात सांगितलेली सूत्रे कृतीत आणतो. तो कोणतेही काम करण्यापूर्वी प्रार्थना करतो आणि काम झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करतो.

१ उ. अद्वैतला त्याचा वाढदिवस देवळात जाऊन साजरा करायला आवडतो.’

२. श्री. सागर नारायण पाटील (कु. अद्वैतचे वडील), कोथरूड, पुणे.

श्री. सागर पाटील

२ अ. देवाची आवड : ‘अद्वैत प्रतिदिन हनुमानचालिसा म्हणतो. तो श्रीरामरक्षा म्हणत असतांना स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण करण्यासाठी प्रभु श्रीरामाला प्रार्थना करतो. हे तो सातत्याने करतो.’

३. सौ. मीनाक्षी पाटील (कु. अद्वैतची आजी (वडिलांची आई), वय ६९ वर्षे) कोथरूड, पुणे.

३ अ. ‘अद्वैतच्या वाणीत गोडवा आहे.

३ आ. प्रेमळ : तो सर्वांशी प्रेमाने बोलतो. तो कुटुंबीय आणि इतर व्यक्ती यांच्याशी सहजतेने जवळीक साधतो. त्याला आजी-आजोबांच्या समवेत रहायला आवडते.

३ इ. मोठ्या व्यक्तींचा आदर करणे : तो कुटुंबातील वडीलधार्‍या व्यक्तींच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार करतो.’

४. श्री. नारायण पाटील (अद्वैतचे आजोबा (वडिलांचे वडील), आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७८ वर्षे), कोथरूड, पुणे.

४ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणे : ‘अद्वैतची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर श्रद्धा आहे. वर्ष २०२३ मध्ये गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘ब्रह्मोत्सव सोहळ्या’त तो आनंदाने सहभागी झाला होता. मे २०२५ मध्ये ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तही तो आनंदाने सहभागी झाला. तेथील वातावरण पाहून तो ‘मला आता अजून चांगली साधना करायची आहे’, असे म्हणत होता. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’नंतर त्याचे साधनेचे प्रयत्न वाढले आहेत.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, कु. अद्वैतची आणि आम्हा कुटुंबियांची साधना होऊन आम्हाला आपल्या चरणी येता येऊ दे’, अशी मी आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करतो.’

५. स्वभावदोष : ‘दूरचित्रवाणी पहाण्यात वेळ घालवणे’

– सौ. स्वाती पाटील.

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.१२.२०२५)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक