काँग्रेसशासित कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे धर्मद्रोही वक्तव्य
मंत्र्यांच्या मद्यपानाला विरोध नसल्याचेही निलाजरे वक्तव्य

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘आजकाल बहुतांश लोक मद्यपान करतात. माझ्या मंत्रीमंडळातील मंत्रीही दारू पितात. वैयक्तिकरित्या माझा मद्यपानाला विरोध नाही’, असे वक्तव्य कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘मद्यपान हा केवळ एक छंद असावा; परंतु ते माणसाचे नियंत्रण हिरावून घेणारे व्यसन बनू नये. (छंद म्हणून चालू केलेल्या मद्यपानाचे व्यसनात कधी रूपांतर होते, हे कळत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी असे आत्मघातकी सल्ले देणे योग्य नव्हे ! – संपादक) पुराणातही देवांनी मद्यपान केल्याचे उल्लेख आहेत.’’
🕉️ “Even Gods used to drink alcohol!” – Shocking anti-Hindu statement by Karnataka CM Siddaramaiah while defending ministers consuming alcohol.
A person elected with the votes of crores of Hindus openly insults Hindu beliefs, yet never dares to make such remarks against other… https://t.co/c5SCCkYmVP pic.twitter.com/YFA6zBpY0G
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2026
या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी एकदा संसदेत झालेल्या चर्चेची आठवण करून दिली. ‘खेड्यापाड्यांतून शहरात दुधाचा पुरवठा होतो; मात्र शहरातून खेड्यापाड्यांत व्हिस्की, ब्रँडी यांसारखी दारू पाठवली जाते’, या तत्कालीन चर्चेचा संदर्भ देत त्यांनी ग्रामीण भागांतील मद्याच्या वाढत्या
प्रभावाविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. (एकीकडे मद्याच्या वाढत्या प्रभावाविषयी चिंता व्यक्त करायची आणि दुसरीकडे मद्यपानाचे समर्थन करायचे, हा सिद्धरामय्या यांचा दुटप्पीपणा होय ! – संपादक)
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत