अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी !

पुणे – शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या तात्काळ अटकेची मागणी वाघोली परिसरातील सकल हिंदु समाजाने केली आहे. वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि हिंदु साधूसंत यांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वाघोली पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून अटक न झाल्यास नगर रोड परिसरात तीव्र जनआंदोलन छेडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. लवांडे यांच्यावर यापूर्वीही वादग्रस्त विधाने करून समाजभावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसात तक्रारी प्रविष्ट असल्याची माहिती निवेदनात नमूद आहे, तसेच या आंदोलनाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोचल्यास त्याचे दायित्व पोलीस प्रशासन अन् शासन यांचे असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित