सामाजिक माध्यमात फ्रान्सिस झेविअरच्या गोव्यातील आगमन दिनाचे गौरवीकरण !

पणजी, १० मे (वार्ता.) – गोव्यात सामाजिक माध्यमातील एका पोस्टद्वारे फ्रान्सिस झेविअरचे ६ मे या दिवशी गोव्यात आगमन झालेल्या दिनाचे गौरवीकरण करणारी पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पोस्टचा हिंदू रक्षा महाआघाडीने निषेध केला आहे.

🚨 Why are those glorifying Portuguese slavery and atrocities in Goa not being charged with treason?
Hindu Raksha Mahaaghadi condemns social media posts glorifying the arrival of Francis Xavier in Goa on May 6, 1542.
🔸 Portuguese rule in Goa led to:
• Destruction of thousands… https://t.co/x1Qus2AxTF pic.twitter.com/XBxIjPJDHE— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2026
यासंबंधी हिंदू रक्षा महाआघाडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘‘६ मे १५४२ हा दिवस गोव्यासाठी अभिमानाचा नसून पोर्तुगीज वसाहतवाद, धार्मिक अत्याचार, सक्तीचे धर्मांतर आणि गोमंतकीय हिंदु समाजावरील दडपशाहीच्या काळाचा प्रारंभ मानला जातो. अशा ऐतिहासिक वेदनादायक पार्श्वभूमीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्या काळाचे उदात्तीकरण करणे अत्यंत निषेधार्ह आहे. गोव्यात पोर्तुगीज राजवटीत सहस्रो हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. धार्मिक स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्यात आले आणि गोव्याची मूळ सांस्कृतिक ओळख नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. अशा काळाशी संबंधित व्यक्तीचे गौरवगान करून गोमंतकियांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळात असतांना परकीय आक्रमकांच्या वारशाचे समर्थन करणे आणि त्यांचे महिमामंडन करणे, हे राष्ट्रीय भावना दुखावणारे कृत्य आहे. अशा पोस्टमधून नेमका कोणता संदेश दिला जात आहे, याची गंभीर चौकशी झाली पाहिजे. हिंदू रक्षा महाआघाडी राज्य सरकार आणि गोवा पोलीस यांच्याकडे मागणी करते की, या प्रकरणाची तात्काळ नोंद घेऊन संबंधितांवर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी. परकीय अत्याचारांचे समर्थन करणार्यांवर देशद्रोहासह लागू कायद्यांनुसार गुन्हा नोंद का करू नये ? याचा सरकारने विचार करावा. गोव्याचा इतिहास हा संघर्ष, श्रद्धा आणि स्वाभिमान यांचा इतिहास आहे. त्या इतिहासाचा अपमान गोमंतकीय जनता सहन करणार नाही.’’
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !