खंडाळा (सातारा) येथे अल्पवयीन मुलासह दोघांवर गोळीबार !

प्रातिनिधिक छायाचित्र

खंडाळा – खंडाळा या ठिकाणी यात्रेमध्ये ‘महाराष्ट्र बेकरी’समोर धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून वादाची घटना घडली. या वादावादीमध्ये एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गोळीबार करण्यात आला.

फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील आशुतोष उपाख्य बंट्या संतोष जाधव याने त्याच्या २ साथीदारांसह हा गोळीबार केला. घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने आशुतोष जाधव यांना पकडून मारहाण केली. या मारहाणीमध्ये जाधव गंभीर घायाळ झाले. त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आशुतोष जाधव यांच्यासमवेत असणार्‍या २ अल्पवयीन साथीदारांनी घटनास्थळावरून दुचाकीवरून पलायन केले. फलटण पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले आहे.