नाशिकमधील कॉर्पाेरेट जिहाद प्रकरणातील आरोपीला आश्रय दिल्याचे प्रकरण
महानगरपालिकेकडून नगरसेवक मतीन पटेल याला नोटीस !

छत्रपती संभाजीनगर – नाशिक येथील व्यावसायिक जिहाद प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात् अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) पक्षाचा नगरसेवक मतीन पटेल याने आश्रय दिला होता. नारेगाव येथील त्याच्या घरात ती रहात होती. ते घर आणि बिस्मिल्ला वसाहतीतील त्याचे दुसरे निवासस्थान अन् मुख्य रस्त्यावरील कार्यालय हे अनधिकृत होते. या प्रकरणी महानगरपालिकेने त्याच्या मालमत्तांवर नोटिसा चिकटवल्या असून ३ दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी प्रशासनाने त्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
Nashik TCS ‘Corporate Jihad’ Case 🚨
Illegal constructions linked to AIMIM corporator Mateen Patel in Chhatrapati Sambhajinagar are set to face bulldozer action.
Case of sheltering Nida Khan, key accused in Nashik conversion case.
The Municipal Corporation has issued a notice… https://t.co/mnitTTAAFI pic.twitter.com/yRq62Hxi9Q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2026
ओवैसी यांच्याकडून गुन्हेगारांचे समर्थन !
‘एम्.आय.एम्.’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र नेहमीप्रमाणे धर्मांध आरोपी निदा खान आणि मतीन पटेल यांची पाठराखण केली. ‘केवळ द्वेषापोटी आरोप केले जात असून बुरखा घालणे अनधिकृत आहे का ? बुरखा आणि धार्मिक पुस्तके बाळगणे हा गुन्हा आहे का ?’ असा कांगावा केला. सुशिक्षित मुसलमान तरुण-तरुणींना लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. (जिहादी मानसिकेतेचे समर्थन करणार्यांच्या पक्षावर कुणी बंदीची मागणी केल्यास काय चुकले ? – संपादक)
मतीन पटेल अटकेत असतांनाही त्याच्या समर्थनार्थ फलक लावलेले आहेत. (असे करणार्यांचाही शोध घेऊन चौकशी करायला हवी ! – संपादक) गेल्या महिन्यात शहागंज भागात अतिक्रमणविरोधी पथकाला मतीन पटेल याने दमदाटी केली होती. (अशांवर वेळीच वचक निर्माण करायला हवा ! – संपादक)
धर्मांध निदा खान हिच्यासह कुटुंबियांचीही कसून चौकशी !मुख्य संशयित निदा खान आणि तिची आई यांना समोरासमोर बसवून पोलिसांनी दीड घंटा प्रश्नांचा भडिमार केला. पसार काळात तिला साहाय्य करणार्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करत आहेत. निदा पसार असतांना तिला कुणी आर्थिक रसद पुरवली आणि ती कुणाच्या संपर्कात होती, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिची आई, वडील, भाऊ आणि मावशी यांचीही चौकशी केली. त्या सर्वांच्या उत्तरांत तफावत आहे का ? हे पोलीस पडताळून पहात आहेत. |
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री