
अमरावती (आंध्रप्रदेश) – राज्यातील दंगेतीवारीपालेम येथील ‘रिडीम इंडिया चर्च’च्या एका पाद्र्याने ‘उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांचे तुकडे केले पाहिजेत’, असे चिथावणीखोर वक्तव्य केले. या प्रकरणी पोलिसांच्या त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🚨 Case registered against a pastor of ‘Redeem India Church’ in Dangetivaripalem for making inflammatory remarks about cutting Andhra Pradesh Deputy CM Pawan Kalyan into pieces.
This exposes the violent mindset hidden behind the repeated preaching of “love” and “peace.”… pic.twitter.com/snltpKcvS4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2026
१. संबंधित पाद्र्याने भाषणाच्या वेळी पवन कल्याण यांच्याविषयी द्वेषयुक्त विधान केले. त्याने ‘जर तुम्ही सनातन धर्मावर विश्वास ठेवत असाल, तर ते तुमच्या आई आणि बहिणीला विकण्यासारखे आहे’, असे विधानही केले होते.
२. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पवन कल्याण यांचे समर्थक यांनी संताप व्यक्त केला आहे.
३. धार्मिक भावना दुखावणे आणि हिंसाचाराला प्रवृत्त करणे, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत आहेत.
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !