लव्ह जिहादविषयीच्या व्याख्यानांसाठी सहकार्याचे आश्वासन

सोलापूर – हिंदु जनजागृती समितीच्या ‘हर घर योद्धा’ अभियानांतर्गत जुळे सोलापूर येथील श्री द्वारकाधीश मंदिर परिसरामध्ये २५ एप्रिल ते ४ मे या काळात १० दिवसीय ‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्वसंरक्षणाची विविध तंत्रे शिकवण्यात आली. दंडसाखळी आणि लाठीकाठी यांचे प्रशिक्षणही देण्यात आले. या वेळी उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांनी उन्हाळ्याच्या सुटीत युवक-युवती यांसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगून लव्ह जिहादविषयी व्याख्याने आयोजित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
भाजप शहर उपाध्यक्ष श्री. संजय साळुंखे यांनी अशा घटनांविषयी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले, तर हिंदु राष्ट्र समन्वयक समितीचे श्री. चंद्रकांत रमणशेट्टी यांनी अशा उपक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्याचे आवाहन केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. संकेत पिसाळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. समारोपाच्या वेळी शिबिरार्थींनी प्रात्यक्षिके सादर केली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. श्री द्वारकाधीश मंदिराचे विश्वस्त श्री. दत्तात्रय पाठक यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

शिबिरार्थींचे अभिप्राय
१. श्री. वरद महेश कुलकर्णी – शिबिरात सहभागी होऊन पुष्कळ छान आणि समाधानकारक अनुभव आला. ‘हिंदु’ आणि ‘धर्म’ या संकल्पनांची सखोल माहिती मिळाली, तसेच या शिबिरातून संपूर्ण धर्मशिक्षण मिळाले.
२. सौ. गौरी श्रीरंग कुलकर्णी – ‘हर घर योद्धा’ हे नाव वाचताच अत्यंत प्रेरणादायी वाटते. या उपक्रमाचा आपणही एक भाग होण्याची संधी मिळाल्याचा पुष्कळ आनंद आहे. या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
३. कु. पार्वती सोमनाथ कलशेट्टी – शिबिर पुष्कळ छान वाटले. येथे अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रशिक्षणातील विविध संकल्पना समजल्या, तसेच लाठीकाठी आणि दंडसाखळीचे प्रकारही शिकता आले.
४. कु. सिद्धेश्वरी जोगुरे – मला हे प्रशिक्षण पुष्कळ छान वाटले. मंदिरात दर्शन कसे घ्यायचे ? नमस्कार कसा करावा ? अशा कृती आम्हाला यातून शिकायला मिळाल्या.
५. श्री. प्रदीप उळागड्डे, शिक्षक – मी माझ्या दोन्ही मुलांना या शिबिरात सहभागी होण्यासाठी पाठवले होते. कधीही हात न उचलणारी माझी मुलगी आज कराटेचे प्रहार करतांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला. या शिबिरामुळे मुलांमध्ये सतर्कता आणि शौर्य वाढले आहे. मी हिंदु जनजागृती समितीचे मनःपूर्वक आभार मानतो.

वैशिष्ट्यपूर्ण१. शौर्य प्रशिक्षण शिबिरामध्ये संस्कृत विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. गौरी श्रीरंग कुलकर्णी यांनी नऊवारी साडी परिधान करून शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला. २. काही शिबिरार्थींनी स्वतः प्रशिक्षण शिकून पुढे हे प्रशिक्षण इतरांना शिकवण्यासाठी सिद्ध होणार, असे सांगितले. ३. या शिबिरामध्ये विविध शाळा आणि शिकवणीवर्गांमधे नोकरी करणारे ४-५ शिक्षकांनी सहभाग घेतला. |
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !