
पुणे – उन्हाळ्याच्या सुटीत शाळा आणि महाविद्यालये बंद असून बहुसंख्य लोक परगावी गेले आहेत. त्यामुळे शहरात रक्तदान शिबिरांची संख्या अल्प असते. मे महिन्यात केवळ २-३ रक्तदान शिबिरे झाली आहेत. शहरातील रक्ताची आवश्यकता पहाता हा आकडा तुटपुंजा आहे. पुणे शहराची प्रतिदिनची रक्ताच्या १ सहस्र ५०० पिशव्यांची आवश्यकता असतांना सध्या जेमतेम ७०० ते ८०० रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’च्या नोंदणीनुसार राज्यात ३७३ रक्तपेढ्या असून पुणे शहरात सार्वजनिक आणि खासगी अशा एकूण ४२ रक्तपेढ्या आहेत. ‘रुग्णांनी केवळ शासकीय रुग्णालयाशी संलग्न असलेल्या रक्तपेढीच्या शिबिरात रक्तदान करावे’, असे आवाहन ‘रक्ताचे नाते’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक राम बांगड यांनी रक्तदात्यांना केले आहे.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या काळात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. यानंतर ३ महिने रक्तदात्याला रक्तदान करता येत नाही. त्यामुळे ठराविक काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे मत ‘के.ई.एम्. रुग्णालया’चे रक्तपेढी प्रमुख आनंद चाफेकर यांनी व्यक्त केले.
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची ‘लेट्सअप न्यूज पोर्टल’कडून मानहानी