प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित !
सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेला धार्मिक प्रारंभ

नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभपर्व २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या २१ फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वज स्तंभावर भगवा धर्मध्वज विधीवत् पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकवण्यात आला. या वेळी अयोध्या न्यासाचे कोशाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
पंचधातूपासून सिद्ध केलेल्या धर्मध्वजस्तंभावर ११ बाय ५ फूट आकाराचा भगवा ध्वज आहे. त्याच्यावर हनुमंतरायांची प्रतिमा, तसेच सूर्यदेवतेचे ‘ॐ’ चिन्ह अंकित करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक सजावट करण्यात आली होती. या सोहळ्यामुळे सिंहस्थ कुंभपर्वाच्या सिद्धतेला धार्मिक प्रारंभ झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी विविध मंत्री, तसेच मान्यवर यांच्यासह वैष्णव आणि शैव आखाड्यांचे महंत, साधू आदी उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !