बंगालमध्ये मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या सूचीपूर्वी जिहाद्यांची सूची बनवा ! – Former Raw Agent Lucky Bisht

भारताची गुप्तचर संस्था ’रॉ’चे माजी एजंट लकी बिष्ट यांची भाजपकडे मागणी

’रॉ’चे माजी एजंट लकी बिष्ट (उजवीकडे)

नवी देहली – भाजपने बंगालमध्ये मंत्रीमंडळासाठी मंत्र्यांची सूची बनवण्यापूर्वी जिहाद्यांची सूची बनवावी, जेणेकरून बंगालला १४ वर्षे होरपळणार्‍या लोकांना शिक्षा दिली जाऊ शकेल, अशी मागणी भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चे माजी एजंट लकी बिष्ट यांनी  केली आहे.

लकी बिष्ट यांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, बंगालमध्ये लवकरच एक नवीन सरकार स्थापन होणार आहे. लोकांनी तुम्हाला (भाजपला) पुष्कळ प्रेम दिले, पूर्ण बहुमत देऊन तुम्हाला निवडून आणले. लवकरच तुमच्या मंत्रीमंडळाची सूची सिद्ध होईल; परंतु माझी एक विनंती आहे की, मंत्रीमंडळातील मंत्र्यांची सूची बनवण्यापूर्वी त्या जिहाद्यांची सूची नक्की बनवा, ज्यांच्या कारवायांमुळे १४ वर्षे ३४९ दिवसांपर्यंत पूर्ण बंगाल होरपळून निघाला. या लोकांनी निष्पाप लोकांना घराबाहेर काढून गोळ्या घातल्या, तसेच महिलांवर बलात्कार केले. या नवीन सरकारला एक विनंती आहे की, त्या जिहाद्यांना त्यांच्या योग्य जागेवर (कारागृहात) नक्की पोचवा.