विकृत आरोपीकडून महिलांसह कोंबड्या-शेळ्या यांच्यावरही अत्याचार ! – गावकर्‍यांची माहिती

नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरण

आरोपी भीमराव कांबळे

पुणे – नसरापूर गावात ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणानंतर गावातील नागरिकांनी आरोपी पहिल्यापासून विकृत असल्याची माहिती दिली. आरोपीने गावातील काही महिलांसह कोंबड्या आणि शेळ्या यांच्यावरही अत्याचार केले होते. २० वर्षांपूर्वी त्याला गावातून हाकलून दिले होते. पुणे पोलिसांनी नराधम आरोपीच्या घराला नोटीस लावली आहे.

१. त्याने वयोवृद्ध महिलेला कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला. तो कुत्र्यांवर अत्याचार त्यांना मारून टाकत असे. आरोपीने त्याच्या मुलींवरही अत्याचार केला होता. याविषयी ठाऊक असूनही त्याच्या पत्नीने हे कुणालाही सांगितले नाही.

२. पूर्ण गावाने त्याला २० वर्षांपूर्वी वाळीत टाकले होते. कुणीही त्यांच्या लग्नकार्यात जात नव्हते. त्यांना बोलवत नव्हते.

३. आरोपीचा मुलगाही याच मानसिकतेचा आहे. त्याने एका वृद्ध व्यक्तीवर कोयत्याने वार केले होते.

संपादकीय भूमिका

अशा विकृत वासनांधांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी !