सनातन धर्माच्या संघटित शक्तीने सनातनद्वेष्ट्या स्टॅलिन कुटुंबियांना त्यांची जागा दाखवून दिली ! – सनातन संस्था

उदयनिधी स्टॅलिन, एम्.के. स्टॅलिन आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक

मुंबई – एम्.के. स्टॅलिन हे आता तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्येच त्यांचा पराभव झाला. त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये सनातन धर्माला संपवण्याचे (‘इरॅडिकेट’ करण्याचे) वक्तव्य केले होते. म्हणे, ‘सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरिया या रोगांप्रमाणे आहे !’ या माध्यमातून त्यानी सनातन धर्माचा भयंकर अपमान केला होता. त्या विरोधात देशभर जनक्षोभ उसळला. आज तमिळनाडूच्या सर्व सनातन धर्मीय बंधू-भगिनींनी सनातन धर्माची संघटित शक्ती या स्टॅलिन कुटुंबियांना दाखवून दिली, अशी रोखठोक भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी तमिळनाडू निवडणुकांच्या निकालांवर घेतली आहे.

श्री. वर्तक पुढे म्हणाले की, एरव्ही सनातन संस्था कुठल्याही प्रकारच्या राजकीय हालचालींवर वक्तव्य करत नाही, परंतु आज आम्हाला आवर्जून याच्यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटते, कारण सनातन धर्मियांच्या संदर्भात या कुटुंबियांनी आणि द्रमुक पक्षाने एक भूमिका घेतली होती. तमिळनाडूतील धर्मप्रेमी जनतेचे आम्ही अभिनंदन करतो !