गोव्यात फ्रान्सिस झेविअरचा कथित अवमान केल्याचे प्रकरण

पणजी – वास्को येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात फ्रान्सिस झेविअरचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी वास्को प्रथमवर्ग न्यायालयाने २ मे या दिवशी गौतम खट्टर यांना जामीन संमत केला.
⚖️ Gautam Khattar has been granted bail in the case involving the alleged insult of Francis Xavier.
The controversy, which sparked significant nationwide debate.#GoaNews #LegalUpdate pic.twitter.com/Gylyl6WUzE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2026
३० एप्रिलला बचाव पक्ष आणि पोलीस यांचे युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर गौतम खट्टर यांच्या जामीन अर्जावरील आदेश न्यायालयाने २ मे २०२६ या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत राखून ठेवला होता. जामीन संमत करतांना न्यायालयाने १५ सहस्र रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका (पर्सनल बाँड) आणि २ हमीदार सादर करणे, अशा प्रकारचा गुन्हा न करणे आणि न्यायालयाच्या अनुमतीविना विदेशात न जाणे, अन्वेषणास पूर्ण सहकार्य करणे, तसेच पुढील चौकशीसाठी आवश्यकतेनुसार उपस्थित रहाणे, या प्रमुख अटी घातल्या आहेत. न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात दोन्ही बाजूच्या लोकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी एक हस्तक्षेप याचिकाही प्रविष्ट (दाखल) करण्यात आली; पण न्यायालयाने गौतम खट्टर यांना जामीन संमत केला.
गौतम खट्टर यांना २८ एप्रिलपासून छातीत दुखत असल्याच्या कारणावरून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आजही ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयीन सुनावणीसाठी उपस्थित राहिले. अधिवक्ता नागेश जोशी, अधिवक्ता अमेय प्रभुदेसाई, मुंबई येथून अधिवक्ता घन:श्याम उपाध्याय आणि अधिवक्ता योगेश देशपांडे या अधिवक्त्यांनी या प्रकरणी गौतम खट्टर यांची बाजू मांडली.
Advocate Sanjiv Punalekar commented on the bail granted to Gautam Khattar in connection with his remarks in the St. Xavier case.#gautamkhattar #hindu #christian #sanatani #stfrancisxavier #arrest #bail #communaltension pic.twitter.com/T19uIsZSZ7
— Goa News Hub (@goanewshub) May 2, 2026
या प्रकरणी अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले,
‘‘अधिवक्ता अमेय प्रभुदेसाई, अधिवक्ता नागेश जोशी, मुंबई येथून अधिवक्ता घन:श्याम उपाध्याय आणि अधिवक्ता योगेश देशपांडे यांचे मी अभिनंदन करतो. हा धर्माचा विजय आहे. या प्रकरणी ज्या हिंदूंनी गौतम खट्टर यांना पूर्ण पाठिंबा दिला, त्यांचेही मी अभिनंदन करतो.’’
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !