परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के लागला !

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल यंदा ८९.७९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. मागील वर्षी हा निकाल ९१.८८ टक्के होता. यंदा परीक्षेत ‘कॉपीमुक्त मोहिमे’ची काटेकोर कार्यवाही करण्यात आल्याने निकालात घट झाली, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Maharashtra: 2.09% drop in Class 12th (HSC) results this year due to the ‘Copy Mukt Abhiyan’!
The overall pass percentage stands at 89.79%!
The outcome of a ‘Copy Mukt Abhiyan’ should be determined by how successful the campaign itself was, not merely by the drop in results.… pic.twitter.com/HOH0BCgNOP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2026
परीक्षेच्या काळात १५ गुन्हे नोंदवण्यात आले, तर १०० कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले. राज्यभरात एकूण १ सहस्र ९८३ गैरप्रकार समोर आले. त्यात २३७ कॉपी आणि १ सहस्र ४६९ सामुदायिक कॉपी प्रकरणांचा समावेश आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यांचाही सकारात्मक परिणाम दिसून आला. केंद्रांवरील व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आल्याने पारदर्शकता वाढली.

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.२५ टक्के असून मुलांची टक्केवारी ८६.८ टक्के आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ६.३५ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !