शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मांधांनी हिंदु युवतींचे ‘व्हिडिओ’ करून ते प्रसारित केल्याचे प्रकरण !
हिंदुत्वनिष्ठांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या !

कोल्हापूर – हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्हिडिओ सिद्ध करून ते प्रसारित करण्याच्या प्रकरणी २ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात बजरंग दलाचे विभाग संयोजक नीलेश शिंदे यांना अज्ञाताने एकांतात गाठून डोक्यावर बंदूक रोखून धमकी दिल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे.
या प्रकरणी शिरोली औद्योगिक वसाहतीतील पोलीस ठाण्यावर हिंदुत्वनिष्ठांनी मोर्चा काढून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित धर्मांध शाहरूख देसाई आणि शाहीद सनदे यांच्या कुटुंबियांना दिलेला पोलीस बंदोबस्त काढून घ्या आणि तो बंदोबस्त नीलेश शिंदे यांना द्या, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे. या प्रकरणी उपस्थित वरिष्ठांनी योग्य ते कार्यवाहीचे आश्वासन दिले. (ज्यांनी अत्याचार केला, त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण कशासाठी ? हा पोलीस प्रशासनाचा अजब न्याय नव्हे का ? – संपादक)
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !