संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ‘एस्.सी.ओ.’च्या बैठकीसाठी किर्गिस्तानमध्ये !

राजनाथ सिंह यांनी घेतली चीन आणि रशिया यांच्या संरक्षणमंत्र्यांशी भेट !

२८ एप्रिल २०२६ रोजी किर्गिस्तानमधील बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटना (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान एका समूह छायाचित्रात केंद्रीय संरक्षण मंत्री, श्री राजनाथ सिंह.

(‘एस्.सी.ओ.’ – शांघायको-ऑपरेशन ऑर्गनायझेशन)

नवी देहली – भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (‘एस्.सी.ओ.’) बैठकीसाठी किर्गिस्तानच्या दौर्‍यावर आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चीन, रशिया आणि बेलारूस या देशांच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.

चीनचे संरक्षण मंत्री ॲड्मिरल डोंग जून यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळी ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर’ शांतता आणि स्थिरता राखणे, तसेच व्यापक प्रादेशिक सुरक्षा या विषयांवर चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव्ह यांचीही भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी विविध संरक्षण खरेदी प्रकल्पांवर, विशेषतः भारताला ‘एस्-४००’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा पुरवठा करण्याच्या सूत्रावर चर्चा केल्याचे समजते. राजनाथ सिंह यांनी बेलारूसचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल व्हिक्टर यांचीही भेट घेतली. त्यांच्या चर्चेचा मुख्य भर दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्यावर होता.