
पुणे – शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक लाभ मिळतो, असे आमीष दाखवून ३७ वर्षीय संगणक अभियंता तरुणीची २ कोटी ३० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. (सायबर गुन्ह्यांचे भयावह स्वरूप पहाता याविषयी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. – संपादक) जानेवारी महिन्यात तरुणीच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यावर गुंतवणुकीचा संदेश आला होता. त्याला भुलून तरुणीने वेळोवेळी रक्कम जमा केली. परतावा मागणी केली असता चोरांनी टाळाटाळ केली, तेव्हा स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. दुसर्या तक्रारीमध्ये निवृत्त संगणक अभियंत्याची शेअर बाजारातील लाभाचे आमीष दाखवून ९९ लाख ९९ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.
राज्यात अवैध बाईक टॅक्सी चालकांचे प्रमाण मोठे : १४ मासांत १ सहस्राहून अधिकांवर कारवाई !
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ घोषित !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन