गाव सोडून निघून जाण्यास सांगितले !
बस्तर (छत्तीसगड) – जिल्ह्यातील रेटावंद गावातील भोळ्याभाबड्या गरीब हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्यावरून गावकर्यांनी एका पाद्र्याला चांगलाच चोप दिला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये मारहाणीच्या वेळी पाद्र्याचा सदरा फाटल्याचे दिसून येत आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघांच्या गटांनी पाद्र्याला लाथा, बुक्के आणि चपलांनी मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Bastar (Chhattisgarh): Villagers confront pastor over Hindu conversions, ask him to leave the village.
Despite Chhattisgarh’s recent anti-conversion law, allegations of illegal conversions continue to surface.
When authorities fail to act effectively, public anger rises and… pic.twitter.com/M559RBfHHS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2026
घटनाक्रमानुसार मूळचा ओडिशाचा असलेला हा पाद्री बर्याच काळापासून रेटावंद गावात वास्तव्यास होता. तो स्थानिक हिंदूंना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करत होता. यामुळे संतप्त गावकर्यांनी २६ एप्रिलला गावात एक बैठक आयोजित करून पाद्र्याला त्याच्या कुटुंबासह गाव सोडून जाण्याचे निर्देश दिले. पाद्र्याने याकडे कानाडोळा केल्याने शेवटी संतप्त झालेल्या गावकर्यांनी त्याला मारहाण केली.
पाद्री लवकरच गाव सोडून जाईल ! – पोलिसांचे आश्वासनपोलीस वेळीच घटनास्थळी आले आणि यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती अटोक्यात आणली. पाद्र्याने लवकरात लवकर गाव सोडून जावे, अशी मागणी गावकर्यांकडून सातत्याने केली जात आहे. यावर पोलिसांनी गावकर्यांना आश्वासन दिले आहे की, पाद्री निश्चितच गाव सोडून जाईल. (खरेतर पोलिसांनी पाद्र्याला अटक करून त्याच्या विरोधात धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत कठोर कारवाई करायला हवी. असे न करणार्या छत्तीसगडमधील भाजप सरकारने संबंधित पोलिसांवरच आता कारवाई केली पाहिजे ! – संपादक) |

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !