दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना साधिका भावाच्या स्तरावर करत असलेले प्रयत्न आणि तिला येत असलेल्या अनुभूती !

१. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना भावाच्या स्तरावर करत असलेले प्रयत्न

सौ. अश्विनी गावडे

१ अ. प्रार्थना आणि नामजपादी उपाय करून सेवेसाठी जाणे : ‘मी सकाळी उठल्यावर ‘गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), मी कसे प्रयत्न करू ? आपणच मला सुचवा. माझा देह, मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊ दे’, अशी प्रार्थना करते. माझ्या मनात अनावश्यक विचार येत असतांना ‘गुरुदेवा, आपणच मला सतत सकारात्मक ठेवा. माझ्याकडून अखंड नामजप होऊ दे. मला सतत कृतज्ञताभावात ठेवा’, अशी मी प्रार्थना करते. नंतर मी नामजपादी उपाय करून आणि घरातील कामे करून सेवेसाठी बाहेर पडते.

१ आ. सेवेविषयी भाव : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक वाचकांना वेळेत द्यायला हवेत’, असे मला वाटते. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे गुरुदेवांचे संदेशपत्र आहे’, असा भाव ठेवून मी त्यांचे वितरण करते. ‘गुरुदेवच माझ्याकडून ही सेवा करून घेत आहेत’, असा मी भाव ठेवते. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतांना मी नामजप करते आणि भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न करते.

१ इ. गुरुदेव, माझे यजमान (श्री. अनिल गावडे) आणि माझी मुले (कु. सिद्धी, वय १७ वर्षे आणि श्री. श्रीधर, वय २० वर्षे) प्रत्येक क्षणी मला साहाय्य करतात. माझी सेवा झाल्यावर मी गुरुदेव, वाचक, माझे यजमान आणि माझी मुले यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांशी जवळीक साधणे

मी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचते आणि त्यात प्रसिद्ध झालेल्या ‘साधकांना आलेल्या अनुभूती अन् साधकांचे साधनेविषयीचे प्रयत्न’ यांविषयी वाचकांना सांगते. मी प्रत्येक रविवारी वाचकांना संपर्क करते. त्यामुळे माझी त्यांच्याशी जवळीक वाढली आहे.

३. वितरणाची सेवा करतांना येत असलेल्या अनुभूती

अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून मला सुगंध येतो आणि मला हलकेपणा जाणवतो.

आ. मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण पायी चालत करत असूनही मला थकवा येत नाही आणि मी सकारात्मक राहिल्याने ‘वितरण कधी होते’, हे माझ्या लक्षातही नाही.

इ. ‘गुरुदेवच माझ्याकडून ही सेवा करून घेत आहेत’, अशी मला अनुभूती येते.

४. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांमध्ये झालेले पालट 

वाचक आठवड्यातून नियमित एक दिवस ‘ऑनलाईन’ सत्संगाला जोडतात. ते अधूनमधून कुडाळ सेवाकेंद्रात सेवेलाही येतात.’

– सौ. अश्विनी अनिल गावडे, पिंगुळी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१०.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक