शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मांधाने हिंदु युवतींचे व्हिडिओ करून ते प्रसारित केल्याचे प्रकरण

कोल्हापूर – हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे ‘व्हिडिओ’ सिद्ध करून ते प्रसारित करण्याच्या प्रकरणी संशयित धर्मांध शाहीद सनदे, ज्या गावात रहातो त्या शिरोली पुलाची गावात २८ एप्रिल या दिवशी संतप्त पडसाद उमटले. सकाळी मोठ्या संख्येने एकत्र आलेले ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी गावाच्या कमानीपासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चा काढला अन् संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी हा मोर्चा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बाहेर अडवला आणि मोर्चास अनुमती नसल्याचे कारण सांगून ग्रामस्थांना परत जाण्यास सांगितले. याप्रसंगी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच पोलीस यांच्यात जोरदार वादावादी झाली. या प्रकरणी ग्रामस्थांनी ‘गाव बंद’ आंदोलन केले.
After Amravati scandal, another shocking incident in Shiroli Pulachi (Kolhapur district)!
Religious fanatic Sameer Sanade filmed and circulated videos of Hindu girls 📱
🚨 Villagers respond with a complete ‘Village Shutdown’ protest
If such incidents are spreading from cities… https://t.co/wbwnX4efHj pic.twitter.com/TpvAXeIkJx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 30, 2026
या प्रकरणात शाहीद सनदे याला साहाय्य करणारा त्याचा मित्र शाहरूख देसाई हा पसार असून त्यालाही तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (हिंदू नेहमीच संयत मार्गाने निषेध नोंदवतात, तर धर्मांध नेहमी कायदा हातात घेतात. असे असले, तरी कायद्याचा बडगा हा नेहमीच हिंदूंवरच का उगारला जातो ? हिंदु युवतींना जाळ्यात ओढून धर्मांध त्यांच्या आयुष्याशी खेळत असतील, तरीही हिंदूंनी आंदोलनसुद्धा करू नये, असे पोलिसांना वाटते का ? – संपादक)
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले, ‘‘आम्हाला मोर्चासाठी अनुमती नसल्याचे कारण सांगून पोलिसांनी रोखले; मात्र २ दिवसांत आम्ही अनुमती घेऊन परत मोर्चा काढणार आहोत. पोलीस आम्हाला ‘मूक मोर्चा काढा’, असे सांगत आहेत; मात्र हिंदू आता शांत बसणार नाहीत. आमच्या माता-भगिनींवर अत्याचार करणार्या धर्मांधांना गावातून हाकलून द्यावे, अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो. पोलिसांनी ४ दिवसांत याचे सखोल अन्वेषण पूर्ण करून संबंधितांवर कठोर कारवाई न केल्यास हिंदूंचा उद्रेक होणे निश्चित आहे.’’
ग्रामपंचायतीने संशयितांच्या घराच्या पिण्याच्या पाण्याची जोडणी तोडली !
कोल्हापूर – या प्रकरणातील धर्मांध शाहीद सनदे आणि शाहरूख देसाई या दोघांच्या घराच्या पिण्याच्या पाण्याची जोडणी ग्रामपंचायतीने तोडली आहे.
शाहीद सनदे याच्या वडिलांची सामाजिक माध्यमांद्वारे क्षमायाचना !
या प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित शाहीद सनदे याचे वडील समीर सनदे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे त्यांच्या मुलाच्या कृत्याविषयी क्षमायाचना केली आहे. ‘माझ्या मुलाने केलेले कृत्य निंदनीय आहे. याला सनदे कुटुंबीय कोणताही पाठिंबा देणार नाहीत. या कृत्याविषयी हिंदु समाज आणि पीडितांची मी क्षमा मागतो. आमच्या मुलाला पोलीस प्रशासन जी शिक्षा देईल ती मान्य आहे’, असा संदेश त्यांनी व्हिडिओद्वारे प्रसारित केला आहे.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !