अद्यापही पोलिसांकडे मूर्तीची ‘मुद्देमाल’ (जप्त केलेली वस्तू) म्हणून नोंद !
या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन चापेकर बंधूंनी घेतली होती भारतमातेच्या स्वातंत्र्याची शपथ !

पुणे – ज्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन चापेकर बंधूंनी भारतमातेच्या स्वातंत्र्याची शपथ घेतली होती, ती श्री हनुमानाची मूर्ती स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही पुणे येथील फरासखाना पोलीस ठाण्यात ‘मुद्देमाल’ म्हणून ठेवली आहे. धर्माभिमानी आणि इतिहासप्रेमी यांनी मूर्तीची सन्मानाने स्थापना करण्याची मागणी केली आहे.
एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने या मूर्तीविषयी विचारणा केल्यावर पोलिसांनी सांगितले की, ही मूर्ती ‘जप्त केलेली वस्तू’ (मुद्देमाल) म्हणून नोंदवलेली आहे. न्यायालयीन आदेशाविना ती कुणाला देता येत नाही. पुण्यात सहस्रो हनुमानभक्त असतांनाही ऐतिहासिक मूर्तीच्या मुक्ततेसाठी कुणीही पुढे आले नाही. ही मूर्ती पोलीस ठाण्यात असल्याने सर्वसामान्यांना सहज प्रवेश मिळत नाही. केवळ पोलीस कर्मचारीच तिची पूजा-अर्चा करतात. इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे यांच्या मते, पेशव्यांच्या काळात फरासखान्याची जागा म्हणजे कपडे ठेवण्याचा गोदाम होता. इंग्रजांनी तेथे पोलीस ठाणे स्थापन केले. रँडच्या वधानंतर चापेकर बंधूंना येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. ऐतिहासिक नोंदींनुसार, मारुतीची ही मूर्ती त्याच काळात पोलिसांच्या कह्यात आली.
इतिहास सांगतो…!क्रांतीकारक दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी अत्याचारी ब्रिटीश अधिकारी रँड याचा वध करण्यापूर्वी याच हनुमान मूर्तीसमोर शपथ घेतली होती. या मूर्तीसमोर ते नेमबाजीचा सरावही करत. रँडच्या वधानंतर संतप्त झालेल्या ब्रिटिशांनी चापेकर बंधूंना अटक तर केलीच; पण सूडबुद्धीने त्यांनी ही मूर्तीही पुराव्याच्या नावाखाली जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केली. |
स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे मूर्ती पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातच होती. एका हनुमानभक्त पोलीस कर्मचार्याने मूर्तीची पूजा चालू केली. हळूहळू पोलीस ठाण्यातच छोटेखानी मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर आजही प्रत्येक शनिवारी पोलीस कर्मचारी या मूर्तीची पूजा करतात.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !