
मुंबई – १ मेपासून महाराष्ट्रात रिक्शा, टॅक्सी, ओला, उबेर आदी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याविषयी शिवसेनेचे नेते संजय निरूपम हे २४ एप्रिल या दिवशी दहिसर लिंक रोड येथे अमराठी चालकांसमवेत संवाद साधणार होते. या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र आले. त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला. या वेळी मनसेचे कार्यकर्ते आणि अमराठी चालक यांच्यामध्ये वाद झाला.
येथे मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखले. या वेळी संजय निरूपम माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हणाले, ‘‘शासनाने मराठीची सक्ती करू नये आणि अमराठी चालकांनीही शासनाची भूमिका समजून घ्यावी.’’ मनसेचे कार्यकर्ते माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हणाले, ‘‘अमराठी चालक २०-२५ वर्षांपासून मुंबईमध्ये रहात असूनही मराठी का बोलत नाहीत. शासनाचा निर्णय स्पष्ट असतांना संजय निरूपम अमराठी लोकांना भडकवत आहेत.’’
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित