कल्याण येथे रुग्णवाहिका येण्यास ४० मिनिटे विलंब; रुग्णाचा मृत्यू !

कल्याण – येथील एक गृहस्थ मेवालाल गुप्ता यांच्या छातीत अचानक कळ येऊन श्वास कोंडू लागल्याने त्यांनी साहाय्यासाठी १०८ क्रमांकावर संपर्क केला. जवळच असलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयातून निघालेल्या रुग्णवाहिकेला संबंधित परिसरात पोचायला ४० मिनिटे लागली. परिणामी रुग्णाचा जागीच मृत्यू झाला.

आधुनिक वैद्याने रुग्णवाहिकेतून न येता स्वतःच्या खासगी गाडीने घटनास्थळ गाठले. आधुनिक वैद्याने स्वतः १० मिनिटांत पोचल्याचे सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करून कारवाईचे आदेश दिले आहे.

संपादकीय भूमिका

  • रुग्णाच्या संदर्भात अक्षम्य हलगर्जीपणा करणार्‍या रुग्णालय प्रशासनातील संबंधितांना पदच्युतच करायला हवे !
  • रुग्णालय जवळ असूनही रुग्णवाहिका पोचण्यास ४० मिनिटे विलंब का झाला ?