उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आर्या प्रशांत वैती ही या पिढीतील एक आहे !
वरळी, मुंबई येथील कु. आर्या प्रशांत वैती (वय १८ वर्षे) हिची तिच्या वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
(‘वर्ष २०२६ मध्ये कु. आर्या प्रशांत वैती (वय १८ वर्षे) हिची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के आहे.’ – संकलक)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’पालकांनो, हे लक्षात घ्या !तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
१. समंजस
अ. ‘आर्या समंजस आहे. ती स्वतःपेक्षा इतरांचा विचार आधी करते.
आ. ती तिचे आई-वडील किंवा घरातील मोठ्या व्यक्ती यांनी सांगितलेले ऐकते आणि त्याप्रमाणे कृती करते.
२. राष्ट्र अन् धर्म यांच्या प्रती अभिमान

एकदा आर्याने तिच्या मैत्रिणींना ‘हलाल’ उत्पादनांच्या (इस्लामी नियमांनुसार अनुमती असलेली उत्पादने) विषयी माहिती दिली आणि तिला ‘हलाल’प्रणीत वस्तू घेण्यापासून रोखले. आर्या तिच्या मैत्रिणी आणि त्यांचे बहीण-भाऊ यांना राष्ट्र अन् धर्म यासंदर्भात सांगत असते.
३. साधनेची ओढ
अ. आर्या नेहमी प्रवासात नामजप करण्याचा प्रयत्न करते.
आ. ती पुष्कळ वेळा शिव किंवा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी सूक्ष्मातून बोलते. तिला संतांविषयी बोलण्यास आवडते. ती आम्हाला साधनेविषयी पुष्कळ प्रश्न विचारते आणि स्वतःच्या मनातील शंकाचे निरसन करून घेते.
४. आश्रमजीवनाची ओढ
अ. तिला आश्रमात जाण्याची ओढ आहे. ती मला अनेक वेळा ‘आश्रमात कधी जाऊया ?’, असे विचारते.
आ. सध्या ती १२ व्या इयत्तेत शिकत आहे आणि सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) ‘फाऊंडेशन’ परीक्षेची (उच्च शिक्षण घेण्यासाठी द्यावी लागणारी प्रारंभिक परीक्षा) सिद्धता करत आहे. तिला शिक्षण झाल्यावर आश्रमात राहून सेवा करायची आहे.
५. ‘कोणतेही संकट आले, तरी त्यातून श्री गुरु बाहेर काढतीलच’, अशी तिची श्रद्धा आहे.
६. अनुभूती : आर्याला कधी कधी स्वप्नात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होते.’
– श्री. प्रशांत वैती (कु. आर्याचे वडील), वरळी, मुंबई. (८.१.२०२६)
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
तळमळीने सेवा करणारे आणि रोगाचे अचूक निदान करण्याची दैवी शक्ती लाभल्याने साधकांचा मोठा आधार असणारे रत्नागिरी येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कै. मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !
सर्वांशी जवळीक साधणारे, ईश्वराप्रती भाव असणारे आणि सर्वांना समवेत घेऊन जाणारे समष्टी व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (वय ४७ वर्षे) !
सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३८ वर्षे) साधकांच्या व्यष्टी साधनेचा घेत असलेला आढावा, म्हणजे साधकांना अंतर्मुखतेकडे नेणारा जणू भावसत्संग !
स्वतःच्या, तसेच साधकांच्या साधनेविषयी तत्त्वनिष्ठ असलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर (वय ४३ वर्षे) !