‘१२.४.२०२६ या दिवशी सुधाकर एकनाथ मिरजकर (वय ६७ वर्षे) यांचे निधन झाले. २४.४.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा चौदावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. श्रीमती संगीता मिरजकर (कै. सुधाकर मिरजकर यांच्या पत्नी), मलकापूर
अ. ‘माझे यजमान सर्वांना प्रिय होते.
आ. ते कधीही सेवेचा कंटाळा करत नसत.’
२. कु. समृद्धी मिरजकर (कै. सुधाकर मिरजकर यांची मुलगी), मलकापूर
अ. ‘बाबा इतरांनी सांगितलेले आनंदाने स्वीकारत असत.
आ. ते नेहमी वैखरीतून नामजप करायचे.’
३. श्री. परेश मिरजकर (कै. सुधाकर मिरजकर यांचा मुलगा), मलकापूर
३ अ. मृत्यूच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना : ‘मी नोकरीनिमित्त कोल्हापूर येथे असतांना बाबांनी त्यांचे निधन होण्याच्या एक दिवस आधी मला स्वतःहून मलकापूर येथे बोलवून घेतले. ‘बाबांना जणू मृत्यूची पूर्वसूचना मिळाली होती’, असे मला वाटते. बाबांना रुग्णालयात वाहनाने घेऊन जात असतांना आमचा श्रीरामाचा नामजप होत होता. त्या वेळी बाबा ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा जप करत होते. नंतर बाबा स्वतःहून म्हणाले, ‘‘आता दत्तगुरूंचा नामजप करूया.’’

‘दिवंगत सुधाकर एकनाथ मिरजकर हे त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगांतही स्थिर राहून तळमळीने सेवा करत असत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही ते सेवेला प्रथम प्राधान्य देत असत आणि नंतर अर्थार्जनासाठी कामे करत असत. ते अजातशत्रू होते. साधकांनाही त्यांच्यातील प्रेमभाव जाणवत होता. समाजातील हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींनाही मिरजकर यांच्यातील गुण जाणवले आणि त्यांनी केलेल्या साधनेचे महत्त्व लक्षात आले. मिरजकर यांच्यामधील ‘प्रेमभाव, स्वीकारण्याची वृत्ती, स्थिरता आणि गुरुकार्याची तळमळ’ या गुणांमुळे मृत्यूसमयी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२४.४.२०२६)
४. वैद्य संजय गांधी, मलकापूर
अ. ‘मिरजकरकाका अजातशत्रू होते.
आ. काकांच्या मुलीचे २ वेळा गंभीर शस्त्रकर्म झाल्यावरही काका स्थिर होते. अलीकडे काकांचा चेहरा पूर्वीपेक्षा प्रसन्न दिसत होता.
इ. त्यांची आर्थिक स्थिती बेताची असतांनाही ते गुरुचरणी धन अर्पण करत असत. ‘आपल्याकडील धन गुरूंचेच आहे’, असा त्यांचा भाव होता.
ई. ते सतत साधनेविषयी बोलत असत. त्यांचा गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती) उत्कट भाव होता.’
५. सौ. ऐश्वर्या देसाई, मलकापूर
अ. ‘काकांमध्ये नीटनेटकेपणा हा गुण होता.
आ. ते सतत शिकण्याच्या स्थितीत असत. ते सेवेतील बारकावे जाणून घेत असत.
इ. ते आम्हाला दैनिक ‘सनातन प्रभात’ द्यायला आल्यावर दैनिकातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सांगत असत.
ई. ते साधनेतील पंचसूत्रे (विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि कृती करणे) आचरणात आणत असत.
उ. काही मासांपासून काकांना विस्मरण होत होते. त्यामुळे मला कधी कधी त्यांचा राग येत असे; मात्र काका त्यांची चूक शांतपणे स्वीकारत होते. ते पुष्कळ संयमी झाले होते.’
६. सौ. पूजा कुलकर्णी, मलकापूर
६ अ. ‘काका नेहमी हसतमुख असत.
६ आ. ते प्रामाणिक होते.
६ इ. त्यांच्यामध्ये कधीही कुणाविषयी पूर्वग्रह किंवा नकारात्मकता नव्हती.
६ ई. सेवाभाव : ते प्रत्येक सेवा तिच्यातील बारकावे जाणून करत असत. ते दैनिक ‘सनातन प्रभात’ची घडी व्यवस्थित घातली जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असत. ते आकाशकंदील आणि भेटकार्ड यांच्याशी संबंधित सेवाही अतिशय चिकाटीने अन् तळमळीने करत असत.
६ उ. वाचकांशी जवळीक साधणे : काका दैनिक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वर्गणीदारांना अंक देतांना दैनिकातील सूत्रे सांगत असत. त्यामुळे वर्गणीदारांना काकांबद्दल पुष्कळ आपलेपणा वाटत असे.’
७. श्रीमती अनिता शेंडे, मलकापूर
७ अ. सेवा परिपूर्ण करणे : ‘काकांकडून मी पुष्कळ सात्त्विक उत्पादने घेत होते. त्या वेळी काका शांतपणे मला सात्त्विक उत्पादने देत असत. ते कधीही प्रतिक्रिया देत नसत. त्यांना विस्मरण होत होते. ते त्यांच्याकडे राहिलेली वस्तू लगेच आणून देत असत.
७ आ. आमच्याकडून काही चूक झाल्यास काका प्रेमाने ती आमच्या लक्षात आणून देत असत.
७ इ. त्यांचे निधन झाल्यावर पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटत आहे.’
८. श्री. प्रसाद कुलकर्णी, मलकापूर
८ अ. काटकसरी : ‘काकांनी कधीही उपाहारगृहामधील अन्नपदार्थ घेतले नाहीत. ते बहुतेक वेळा चालत जात असत किंवा बसने प्रवास करून सेवा करत असत. ते आवश्यक तेथेच दुचाकी गाडीने जात असत. ते अनावश्यक खरेदी करत नव्हते. त्यांच्या मनात गुरुधन वाचवण्याचा विचार सतत येत असे.
८ आ. प्रेमभाव : काका सर्वांशी प्रेमाने वागत. ते कुणालाही वाईट वाटेल, असे बोलत नसत.
८ इ. सेवेला प्राधान्य देणे : काका दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे बसमधून काढून घेणे आणि त्यांचे वितरण करणे, सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, प्रसार करणे इत्यादी सेवा करूनच त्यांचे इलेक्ट्रिकचे दुकान उघडत असत.
८ ई. आजारपणात शेवटपर्यंत स्थिर रहाणे : काका शेवटपर्यंत नामजप करत होते. त्यांना मृत्यूसमयी वेदना जाणवल्या नाहीत. काकांनी शेवटच्या क्षणापर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा केली. त्या वेळीही त्यांचा नामजप चालू होता.
८ उ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
८ उ १. अंत्यविधीच्या वेळी स्मशानभूमीत शांत वाटणे : काकांच्या अंत्यविधीच्या वेळी स्मशानभूमीत शांत वाटत होते. त्या वेळी सर्वांकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ११ वेळा करून घेतला.’
९. आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे), कोल्हापूर
९ अ. अनेक कौटुंबिक अडचणी असूनही नेहमी सेवेला प्राधान्य देणे : ‘मिरजकरकाकांनी २६ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा केली. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांनी आणि त्यांच्या पत्नी श्रीमती संगीता मिरजकर यांनी ही सेवा इतके वर्षे अतिशय तळमळीने केली. मिरजकरकाकूंना शारीरिक त्रासांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे शक्य होत नसतांना काकांनी एकट्याने ही सेवा केली. काकांना अनेक कौटुंबिक अडचणी असूनही त्यांनी नेहमी सेवेला प्राधान्य दिले.
९ आ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
९ आ १. पार्थिवाचे दर्शन घेतांना ‘काका शांत झोपले आहेत’, असे वाटणे : मी कोल्हापूर येथून मलकापूर येथे काकांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले. तेव्हा मला स्मशानभूमीतही शांत वाटले. त्या वेळी ‘काका शांत झोपले आहेत’, असे मला वाटले.
९ आ २. हिंदुत्वनिष्ठ व्यक्तींनी मिरजकरकाकांविषयी काढलेले कौतुकोद्गार : काकांच्या अंत्ययात्रेच्या वेळी गावातील अनेक व्यावसायिक, हितचिंतक आणि वाचक आले होते. तेव्हा माझी हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ आणि श्री. चारुदत्त पोतदार यांच्याशी भेट झाली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मिरजकरकाकांना इतक्या अडचणी होत्या, तरीही ते कधी उदास नसायचे. ते नेहमी सेवारत असत. त्यांनी सर्व परिस्थिती स्वीकारली होती. त्यांना ही शक्ती त्यांच्या साधनेतूनच मिळाली असावी.’’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १९.४.२०२६)
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !