
सातारा, २२ एप्रिल (वार्ता.) – श्रीक्षेत्र चाफळ येथील शिंगणवाडीमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांची प्रथम भेट वर्ष १६४८ मध्ये झाली होती. राष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती. याचे स्मरण रहाण्यासाठी प्रतिवर्षी वैशाख शुक्ल नवमी हा दिवस ‘श्री शिव-समर्थ प्रेरणादिनोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी २५ एप्रिल २०२६ या दिवशी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘प्रतापगड उत्सव समिती’चे मार्गदर्शक, गोरक्षक तथा ‘श्री शिव-समर्थ प्रेरणादिनोत्सव समिती’चे प्रमुख श्री. मिलिंद एकबोटे यांनी दिली.
एकबोटे पुढे म्हणाले, ‘‘२५ एप्रिल या दिवशी शिंगणवाडी येथे राज्याचे पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे, राजघराण्यातील श्रीमंत वृषालीराजे भोसले आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील ह.भ.प. माणिक महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. दुपारी ४ वाजता पालखीतून श्री शिव-समर्थ यांची मिरवणूक काढण्यात येईल. यानंतर आयोजित धर्मसभेमध्ये मान्यवर वक्ते मार्गदर्शन करतील. तरी शिंगणवाडी, श्रीक्षेत्र चाफळ आणि पंचक्रोशीतील श्री शिव-समर्थ भक्तांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.’’
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री