
सातारा, २१ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सनातन संस्थेच्या वतीने शहरातील पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिरामध्ये श्री दुर्गादेवीला रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती. सनातन संस्थेच्या सौ. विद्या कदम यांनी उपस्थितांना हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ दिली. या वेळी ३५ हून अधिक भाविक-भक्त, धर्मप्रेमी आणि राष्ट्रभक्त नागरिक उपस्थित होते.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच