वाळकी (कर्नाटक) येथे उत्सव आदर्शरित्या साजरे करणारे बसवेश्वर मंडळ !

संत महात्मा बसवेश्वर

निपाणी (कर्नाटक) – वाळकी येथील बसवेश्वर मंडळात अक्षय्य तृतीया आणि बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील मंडळातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन केल्यावर स्थानिक युवकांनी अन्य लोकांच्या विरोधाला न जुमानता ‘डी.जे.’ (मोठा आवाज करणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावण्याचे रहित करून लेझीम पथकाद्वारे आदर्श मिरवणूक काढली. मंडळात हिंदु जनजागृती समितीचे साधक श्री. निगोंडा पाटील यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यात त्यांनी हिंदु धर्मात सण साजरे करण्याचे महत्त्व, आदर्श पद्धतीने उत्सव कसे साजरे करावेत ?, धर्माचरणाचे महत्त्व, तसेच अन्य विषयांवर प्रबोधन केले.

याचे सर्व आयोजन हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या युवकांनी केले होते. उत्सवाच्या कालावधीत हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्राची विविध माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

आदर्श उत्सव साजरी करणारी मंडळे उद्या आदर्श समाज निर्माण करू शकतील !